TRENDING:

सोलापूरमध्ये ऑपरेशन लोटसची चाहूल; अजित पवार अॅक्शन मोडमध्ये, थेट मामांना धाडलं

Last Updated:

अजित पवार यांनी आपले विश्वासू सहकारी कृषिमंत्री यांना सोलापूरच्या दौऱ्यावर पाठवले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रीतम पंडित, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

सोलापूर : सोलापूर राष्ट्रवादी (अजित पवार) दोन दिवसांपूर्वीच राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे तब्बल चार माजी आमदार भाजपच्या वाटेवर आहेत, त्यामुळे डॅमेज कंट्रोलसाठी आता उपमुख्यमंत्री अजित पवार अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. अजित पवार यांनी आपले विश्वासू सहकारी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना सोलापूरच्या दौऱ्यावर पाठवले आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणेवर नाराज असणाऱ्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

advertisement

राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोलापूरचे संपर्क मंत्रिपद देण्यात आलं आहे . माढा येथे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे मंगळवारी दुपारी ग्रामीण भागातील तर शहरातील पदाधिकाऱ्यांची सायंकाळी पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. भरणे आता नेमके कशा पद्धतीने नाराजांची समजूत घालतात आणि यातील किती जणांना राष्ट्रवादीसोबत ठेवतात, हे पाहावे लागणार आहे.

advertisement

अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक

नगोर्लीची बैठक आटोपून संपर्कमंत्री भरणे मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास सोलापूर शहरात येणार आहेत. शासकीय विश्रामगृहात ते सोलापूर शहर राष्ट्रवादीचा आढावा घेणार आहे. शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. याबाबतीतही चाचपणी होण्याची शक्यता आहे. कृषिमंत्री भरणे यांच्यावर सोलापूरच्या संपर्कमंत्रिपदाची जबाबदारी आल्यानंतर सोलापुरातील काही कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. या उत्साहाचा चांगलाच अनुभव संपर्कमंत्री भरणे यांनी मागील दौऱ्यात घेतला आहे. हा उत्साह आवरण्याचे मोठे आव्हान मंत्री भरणे यांच्यासमोर दिसत आहे.

advertisement

भरणेमामांचा सोलापूर दौरा महत्त्वपूर्ण

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात गाईचे तूप आरोग्यासाठी फायदेशीर, त्वचा राहील तजेलदार,आणखी हे फायदे पाहा
सर्व पहा

सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या तीन माजी आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे . नाराज असणाऱ्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याची दत्तात्रय भरणे यांच्यावर जबाबदारी असणार आहे. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजित सिंह यांनी नुकतीच देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. या पार्श्वभूमीवर भरणेमामांचा सोलापूर दौरा महत्त्वपूर्ण मानला जातो.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सोलापूरमध्ये ऑपरेशन लोटसची चाहूल; अजित पवार अॅक्शन मोडमध्ये, थेट मामांना धाडलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल