TRENDING:

Ordnance Factory Recruitment 2025: ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये 50 पदांसाठी भरती, सरकारी नोकरीची उत्तम संधी

Last Updated:

देहू रोडवरील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये नोकरभरती आहे एकूण 50 जागांवरील भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. जर तुम्ही सुद्धा ITI चे विद्यार्थी असाल, तर तुम्ही नोकरीसाठी अर्ज दाखल करू शकणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
देहू रोडवरील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये नोकरभरती आहे एकूण 50 जागांवरील भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. जर तुम्ही सुद्धा ITI चे विद्यार्थी असाल, तर तुम्ही नोकरीसाठी अर्ज दाखल करू शकणार आहेत. Attendant Operator Chemical Plant Trade चे शिकाऊ उमेदवार, सरकारी किंवा खाजगी क्षेत्रातील उमेदवार असाल तर तुम्ही नोकरीसाठी अर्ज करू शकणार आहेत. सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये सरकारी नोकरीसाठी ही एक उत्तम संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 07 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. अधिक माहितीसाठी बातमीमध्ये इच्छूक आणि पात्र उमेदवारांसाठी अधिकृत जाहिरातीची PDF शेअर करण्यात आली आहे.
Ordnance Factory Recruitment 2025: ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये 50 पदांसाठी भरती, सरकारी नोकरीची उत्तम संधी
Ordnance Factory Recruitment 2025: ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये 50 पदांसाठी भरती, सरकारी नोकरीची उत्तम संधी
advertisement

भरतीसाठी आवश्यक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज कसा करावा, कोणत्या चाचण्या उत्तीर्ण कराव्या लागतील, किती वेतन दिले जाईल सर्व जाणून घेऊया. पुण्याच्या देहू रोडवरील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये डेंजर बिल्डिंग वर्कर (Danger Building Worker- DBW) पदासाठी 50 जागांसाठी नोकरभरती केली जाणार आहे. डेंजर बिल्डिंग वर्कर पदासाठी शैक्षणिक पात्रता देखील देण्यात आली आहे. ऑर्डनन्स फॅक्ट्रीमधील AOCP ट्रेड (NCTVT) चे माजी शिकाऊ उमेदवार किंवा सरकारी/ खाजगी संस्थेतील AOCP ट्रेड (NCTVT) उमेदवार आणि सरकारी ITI मधील AOCP (NCTVT) असलेल्या उमेदवारांचा विचार केला जाईल, अशी शैक्षणिक पात्रता आहे.

advertisement

ऑर्डनन्स फॅक्टरीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर नोकरभरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. उमेदवार अधिकृत अधिसूचनेनुसार या पदांसाठी अर्ज करू शकता. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन नसून ऑफलाईन आहे. जाहिरातीच्या PDF मध्ये इच्छुक आणि पात्र अर्जदारांसाठी अर्ज देण्यात आला आहे. अर्जदारांना संपर्क करण्यासाठी फॅक्टरीने त्यांचा ईमेल आणि टेलीफोन क्रमांक सुद्धा दिला आहे. The Chief General Manager, Ordnance Factory Dehu Road, Pune-412101 हा अर्जदारांना अर्ज पाठविण्याचा पत्ता आहे. ईमेल आयडी ofdrestt@ord.gov.in हा असून टेलीफोन क्रमांक 020-27167246/47/98 असा आहे. अर्जदारांसाठी कोणतेही शुल्क नाही.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
भाऊबीजची शॉपिंग करताय? 350 रुपयांत मिळतायत 3-पीस कॉटन ड्रेस, हे आहे लोकेशन
सर्व पहा

वयोमर्यादा किमान 18 वर्षे ते कमाल 40 वर्षे इतके आहे. हे वय 07 नोव्हेंबर 2025 पर्यंत पूर्ण असावे. अनुसूचित जाती- जमातीच्या उमेदवारांना 5 वर्षांची सूट आणि इतर मागासवर्गातील उमेदवारांना 3 वर्षांची सूट आहे. नोकरीचे ठिकाण पुण्यानजीक असलेले देहू रोड इथे आहे. अधिक माहितीसाठी अर्जदारांनी जाहिरातीची PDF एकदा आवश्यक वाचावी.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ordnance Factory Recruitment 2025: ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये 50 पदांसाठी भरती, सरकारी नोकरीची उत्तम संधी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल