TRENDING:

महायुतीत पहिली फूट! जळगावात शिंदे गटानंतर भाजपच्या नेत्याकडूनही स्वबळाची घोषणा, तातडीच्या बैठकीत निर्णय

Last Updated:

महायुतीत निवडणुकीआधीच राजकीय फटाके फुटायला सुरुवात झाली आहे. जळगावच्या पाचोरा भडगावमध्ये निवडणुकीपूर्वीच युती फिसकटली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विजय वाघमारे, प्रतिनिधी जळगाव: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्र लढणार की स्वबळावर? हे अद्याप निश्चित झालं नाही. मात्र तिन्ही पक्षाकडून स्वबळावर निवडणूक लढायची तयारी सुरू आहे. संबंधित पक्षाच्या नेतृत्वाकडून त्याबाबतचे आदेशही स्थानिक नेत्यांना देण्यात आले आहेत. युती करायची की स्वबळावर निवडणूक लढायची, याचे निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात येतील, असं अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं.
News18
News18
advertisement

यानंतर आता महायुतीत निवडणुकीआधीच राजकीय फटाके फुटायला सुरुवात झाली आहे. जळगावच्या पाचोरा भडगावमध्ये निवडणुकीपूर्वीच युती फिसकटली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी अलीकडेच स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. यानंतर भाजपने देखील तातडीची बैठक घेऊन स्वबळावर निवडणूक लढवण्याचे जाहीर केले.

यामुळे जळगाव जिल्ह्यात महायुतीतील राजकीय वातावरण तापले आहे. पाचोरा-भडगाव मतदारसंघात शिवसेना आणि भाजपचा जाहीरपणे स्वतंत्र निवडणुका लढण्याचा हा राज्यातला पहिला निर्णय आहे. त्यामुळे राज्यात इतर जिल्ह्यात नेमकं काय होणार? तिन्ही पक्ष एकत्र लढणार की सगळीकडे जळगाव पॅटर्न राबवला जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

advertisement

महायुतीत नक्की कुठे बिनसलं?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनला भाव वाढ नाहीच, कांदा अन् मक्याला काय मिळाला आज दर? Video
सर्व पहा

पाचोरा-भडगाव मतदार संघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पाचोरा भडगाव येथील नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर निवडणूक लढवण्याचे जाहीर केलं होतं. यानंतर भाजपच्या वतीने चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी तातडीने बैठक घेऊन भाजपही स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे निवडणुका घोषित होण्यापूर्वीच पाचोरा-भडगाव मतदारसंघात युती फिसकटली असून युतीत निवडणुका न लढण्याचा निर्णय घेणारा पाचोरा मतदारसंघ हा राज्यात पहिला ठरला आहे. दरम्यान, पाचोरा भडगावच्या निमित्ताने महायुतीतील वातावरण मात्र जिल्ह्यात चांगलेच आपले असल्याचे बघावयास मिळत असून महायुतीमध्ये राजकीय फटाके फुटायला सुरुवात झाली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महायुतीत पहिली फूट! जळगावात शिंदे गटानंतर भाजपच्या नेत्याकडूनही स्वबळाची घोषणा, तातडीच्या बैठकीत निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल