पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील सारशी गावात ग्रामपंचायत सदस्य नरेश लहु नडगे राहत होता.त्याचं वय 39 वर्ष होतं. काही वर्षापुर्वीच त्याचं लग्न झालं होतं. या लग्नापासून त्याला दोन मुलं देखील होती. सगळं काही सुरळीत चाललं होतं. पण अचानक त्याला त्याच्या जुन्या प्रेयसीची आठवण झाली आणि धक्कादायक घटना घडली आहे.
खरं तर नरेश नडगे याचं त्यांच्यात गावातील 25 वर्षाच्या सारिका शंकर महाला या तरूणीवर लहानपणापासून प्रेम होते. दोघांना एकमेकाशी लग्न देखील करायचं होतं. पण कुटुंबियांचा या लग्नाला विरोध होता. या विरोधापायी नरेश नडगे यांच दोन वर्षापूर्वीच लग्न झालं होतं.या लग्नापासून त्यांना दोन मुले होती.खरं तर हे लग्न झाल्यानंतर नरेशने आपलं लहाणपणीचं प्रेम विसरणे अपेक्षित होते. पण नरेश काय लहाणपणीचं प्रेम विसरला नाही. तसेच त्याच्या मनात कुटुंबियांनी लग्नाला केलेल्या विरोधाचा प्रचंड राग होता. या रागातून आता त्याने प्रेयसीसोबत मिळुन टोकाचे पाऊल उचलले आहे.
advertisement
नरेश लहु नडगे आणि सारिका शंकर महाला या दोघांनी सारशी गावातील एका झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. दोघांचे लहाणपणापासून एकमेकांवर प्रेम होते.पण दोघांच्या लग्नाला कुटुंबियांचा विरोध होता. या विरोधाला उत्तर म्हणून दोघांनी शेतात एकाच झाडाला गळफास घेऊन आयुष्य संपवले आहे. या घटनेने नडगे आणि महाला कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. तसेच या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
