स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारस कोण ठरवत आहे. एक भ्रष्टाचारी कारागृहात बरेच महिने काढून आलेला. आणि दुसरी जी रोज उठून आपल्याच कुंकवाची अब्रू जगाच्या वेशीवर टांगते. स्वर्गीय मुंडे साहेब यांचा वारसा मग तो सामाजिक असो किंवा राजकीय असो. फक्त आणि फक्त माझी पंकू ताई. दुसरे कोणी नाई. अशा शब्दात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. पंकजा मुंडेंना संपवायला आलेले अनेक जण स्वतः संपलेत हे लक्षात ठेवा, असा इशाराही प्रकाश महाजनांनी दिला.
advertisement
मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?
प्रकाश महाजन यांनी गोपीनाथ मुंडेंच्या वारसदार पंकजा मुंडेच असल्याचं ठणकावून सांगितलं. त्यामुळे बीड जिल्ह्यातील नेतृत्व कुणाच्या हातात आहे, याकडे एक प्रकारे प्रकाश महाजनांनी अंगुलीनिर्देश केला. तर अनेकदा पंकजा मुंडेंवर टीका करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनीही पंकजा मुंडेच गोपीनाथ मुंडेंच्या वारसदार असल्याचं सांगितलं. रक्ताने हात भरलेले लोक भुजबळांनी जमा केले आहेत. भुजबळांना मुंडे कुटूंबाला तुम्हाला हिणवायचं आहे का? अशी टीका जरांगे पाटलांनी केली.
प्रकाश महाजन नेमकं काय म्हणाले?
गोपीनाथ मुंडे हयात असतानाच धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंची भक्कमपणे साथ दिली होती. मात्र बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे हेच गोपीनाथरावांचे खरे वारसदार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्याला आता प्रकाश महाजनांनी छेद दिलाय.