अनंत गर्जे आणि डॉ. गौरी यांचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. नवीन संसाराची स्वप्ने पाहत असतानाच हा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. ७ फेब्रुवारी रोजी या जोडप्याने लग्नगाठ बांधली होती. मात्र, वरळीमध्ये डॉ गौरी गर्जे यांनी स्वत:ला संपवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अनंत गर्जे यांचे विवाहबाह्य संबंध होते. त्यावरून गर्जे दाम्पत्यांमध्ये वाद, भांडण सुरू होती. यातून डॉ. गौरी यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
advertisement
>> अनंत गर्जे यांनी काय म्हटले?
पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. गर्जे यांनी सांगितले की, घटनेच्या वेळी ते घरी नव्हतो, असं सांगत त्यांनी स्पष्ट केले असून घरात प्रवेश केल्यानंतर समोर आलेल्या धक्कादायक परिस्थितीचे वर्णन त्यांनी केले.
अनंत गर्जे यांनी सांगितले, “घटना घडली त्यावेळी मी घरी नव्हतो. घरी परतलो तेव्हा घराचे दरवाजे आतून बंद होते. कितीही आवाज दिला तरी प्रतिसाद मिळाला नाही.” यावेळी घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी धाडस करून ३१ व्या मजल्यावरील घराच्या खिडकीतून खाली उतरत ३० व्या मजल्यावरील आमच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला. “घरात शिरलो तेव्हा गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्या क्षणी मी पूर्णतः हादरलो,” असे त्यांनी सांगितले. “गौरीला खाली उतरवून मी तातडीने रुग्णालयात नेलं, असल्याचे गर्जे यांनी सांगितले.
> डॉ. गौरी यांच्या कुटुंबीयांचे आरोप....
कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, तरुणीने पतीच्या कथित संबंधांचे काही पुरावे स्वतःच्या वडिलांना पाठवले होते या डिजिटल पुराव्यांची पडताळणी करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. ही आत्महत्या आहे की त्यामागे इतर कोणता संशयास्पद प्रकार आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू असल्याचे समजते.
> पोलिसांचा तपास सुरू...
या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, मृतदेहाची पोस्टमॉर्टेमसाठी पाठवणी करण्यात आली आहे कुटुंबीयांचे जबाब नोंदवून, मोबाईल चॅट, कॉल रेकॉर्ड व इतर तांत्रिक पुरावा तपासात घेतले जात आहेत. घटनेमागील कारणांबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. तपासातूनच गौरी गर्जे यांच्या आत्महत्येमागील सत्य स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
