TRENDING:

मृत व्यक्तीला जिवंत दाखवलं, पनवेलमध्ये माजी नगरसेवकाने हडपली कोट्यवधींची प्रॉपर्टी

Last Updated:

नवी मुंबई जवळील पनवेल शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथं मृत व्यक्ती जिवंत असल्याचे भासवून, त्यांच्या नावे असलेला ११०० चौरस मीटरचा भूखंड हडपला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी मुंबई जवळील पनवेल शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथं मृत व्यक्ती जिवंत असल्याचे भासवून, त्यांच्या नावे असलेला ११०० चौरस मीटरचा भूखंड हडप केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सिडकोनं केलेल्या तक्रारीवरून भाजपचे माजी नगरसेवक सुनील बहिरा यांच्यासह तब्बल १२ जणांविरुद्ध पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या भूखंड घोटाळ्यामुळे पनवेलच्या राजकारणात आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
पनवेल जमीन घोटाळा
पनवेल जमीन घोटाळा
advertisement

पनवेलमधील तक्का गावातील रहिवासी विष्णू बहिरा यांच्या संपादित जमिनीच्या मोबदल्यात सिडकोकडून मिळणाऱ्या भूखंडासाठी हा मोठा घोटाळा करण्यात आला आहे. विष्णू बहिरा यांचा मृत्यू झाल्यानंतर, बहिरा कुटुंबातील सदस्यांनी संगनमताने बनावट कागदपत्रे तयार करून हा भूखंड मिळवण्याचा कट रचल्याचे सिडकोच्या चौकशीत उघड झाले आहे.

या घोटाळ्यासाठी, मृत विष्णू बहिरा यांचे बनावट ओळखपत्र बनवण्यात आले. विशेष म्हणजे, या ओळखपत्रावर मृत विष्णू बहिरा यांच्याऐवजी सखाराम ढवळे नावाच्या व्यक्तीचा फोटो लावण्यात आला. त्यानंतर ढवळे यांनाच मृत विष्णू बहिरा असल्याचे भासवण्यात आले. या ढवळे नावाच्या व्यक्तीकडूनच बनावट कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या घेऊन हा संपूर्ण घोटाळा करण्यात आला, अशी धक्कादायक माहिती सिडकोने केलेल्या सखोल चौकशीत समोर आली आहे.

advertisement

२००६ पासून पनवेल तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय आणि सिडकोच्या विविध कार्यालयांत या बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला होता. भाडेपट्टा करारनामा आणि त्रिपक्षीय करारासारख्या महत्त्वाच्या वेळीही सखाराम ढवळे हा व्यक्ती मृत विष्णू बहिरा म्हणून उपस्थित राहिला होता.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बाबासाहेबांनी वाचलेली पुस्तकं तुम्ही पाहिलीये का? छ.संभाजीनगरमध्ये इथं भेट द्या
सर्व पहा

या प्रकरणाची सिडकोने तक्रार केल्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी सोमवारी (दि. २ डिसेंबर) सुनील बहिरा यांच्यासह १२ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सुनील बहिरा यांनी नुकताच शेकापमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रकरणामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पोलीस या भूखंड घोटाळ्याचा पुढील तपास करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मृत व्यक्तीला जिवंत दाखवलं, पनवेलमध्ये माजी नगरसेवकाने हडपली कोट्यवधींची प्रॉपर्टी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल