बाबासाहेबांनी वाचलेली पुस्तकं तुम्ही पाहिलीये का? छ.संभाजीनगरमध्ये इथं भेट द्या
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
छत्रपती संभाजीनगर आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अगदी जवळचा संबंध आहे. बाबासाहेब काही दिवस शहरामध्ये वास्तव्यासाठी देखील होते.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अगदी जवळचा संबंध आहे. बाबासाहेब काही दिवस शहरामध्ये वास्तव्यासाठी देखील होते. याठिकाणी बाबासाहेबांनी वापरलेल्या वस्तूंचे संग्रहालय आहे. येत्या 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या कार्याचं स्मरण केलं जातं. त्यांच्या काय आठवणी आहेत? याबद्दच मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शांतीलाल राठोड यांनी माहिती सांगितली आहे.
बाबासाहेब शहरामध्ये वास्तव्यास होते. त्यांनी अनेक दिवस शहरामध्ये घालवलेले आहेत. बाबासाहेब जेव्हा शहरामध्ये यायचे तेव्हा ते शहरातील नागसेनवन आणि छावणी परिसरामध्ये वास्तव्यास होते. बाबासाहेब जेव्हा यायचे तेव्हा त्यांना जाणवले की मराठवाडा हा शिक्षणाच्या बाबतीत मागासलेला आहे. म्हणूनच त्यांनी या ठिकाणी मिलिंद महाविद्यालयाची 1950 रोजी स्थापना केली.
advertisement
बाबासाहेबांनी स्वतः ही जागा विकत घेतली आणि या ठिकाणी मिलिंद महाविद्यालयाची सुरुवात केली. या महाविद्यालयाचे जेव्हा बांधकाम सुरू झाले तेव्हा स्वतः बाबासाहेब काही दिवस या ठिकाणी होते. त्यांच्या देखरेखीमध्ये संपूर्ण या महाविद्यालयाचे बांधकाम झालेले आहे.
बाबासाहेब जेव्हा इथे वास्तव्यास होते, तेव्हा त्यांनी या ठिकाणी देखील त्यांचे वाचन सुरू ठेवले होते. त्यांनी वाचलेली जी सर्व पुस्तके आहेत, त्या सर्व पुस्तकांचा संग्रह हा मिलिंद महाविद्यालयातील ग्रंथालयामध्ये आहे. या ठिकाणी त्यांनी हाताळलेली सर्व पुस्तके ठेवण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर या महाविद्यालयांमध्ये एक छोटेसे संग्रहालय देखील आहे. या संग्रहालयामध्ये बाबासाहेबांनी वापरलेल्या वस्तू आहेत यामध्ये त्यांनी वापरलेली भांडी त्याचबरोबर त्यांनी वापरलेले नॅपकिन, खुर्ची, गादी हे सर्व साहित्य या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे.
advertisement
view commentsLocation :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
December 04, 2025 4:03 PM IST
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
बाबासाहेबांनी वाचलेली पुस्तकं तुम्ही पाहिलीये का? छ.संभाजीनगरमध्ये इथं भेट द्या

