याप्रकरणी पालम पोलीस ठाण्यामध्ये आठ जणांच्या विरोधात खून करून, पुरावा नष्ट केल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीमा (नाव बदलेलं) असं 19 वर्षीय तरुणीचं नाव आहे. या प्रकरणी तिचे वडील, आई, आणि भावकीतील इतक नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत तरुणीचे गावातील दुसऱ्या जातीतील मुलासोबत प्रेम संबंध होते. त्यातून आंतरजातीय विवाह करू नये, असा घरातील मंडळींचा आग्रह होता. परंतु सीमा त्या मुलासोबत लग्न करण्यावर ठाम होती. त्यातून 21 एप्रिल रोजी पहाटेच्या दरम्यान तिचा खून करण्यात आला आणि त्याच रात्री कोणालाही माहिती होऊ नये, यासाठी भावकितील निवडक लोकांना सोबत घेऊन, स्मशानभूमीत जाळून पुरावा नष्ट करण्यात आला. या प्रकरणाची अनेक जणांना माहिती असताना देखील सर्वांनी गुप्तता पाळली. अखेर पोलिसांना कुणकुण लागल्यावर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
advertisement
वाचा - फिटनेससाठी बापाने हायस्पीड ट्रेडमिलवर धावायला लावलं; 6 वर्षीय मुलाचा मृत्यू
कशी फुटली गुन्ह्याला वाचा?
21 एप्रिलच्या रात्री दहाच्या दरम्यान आपल्या मुलीला आई वडील समजावून सांगत होते. तो मुलगा दुसऱ्या जातीतला आहे. आपली समाजात इज्जत जाईल. आम्हाला हा विवाह मान्य नाही तू तो विषय मनातून काढून टाक. मात्र, त्यानंतरही मुलीवर काहीच परिणाम झाला नाही. मुलगी आपल्या निर्णयावर ठाम होती. त्या मुलासोबतच लग्न करणार असल्याचे आपल्या आई-वडिलांना सांगत होती. या गोष्टीचा राग अनावर झाल्याने वडिलांनी मुलीचा गळा दाबून खून केला.
