फिटनेससाठी बापाने हायस्पीड ट्रेडमिलवर जबरदस्ती धावायला लावलं; 6 वर्षीय चिमुकल्याचा धक्कादायक शेवट
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
एका माणसाला आपल्या मुलाचा लठ्ठपणा आवडला नाही. यासाठी त्यानी आपल्या मुलाला ट्रेड मिलवर एवढ्या जोरात धावायला लावलं की त्याचा मृत्यू झाला
नवी दिल्ली : फीट राहण्यासाठी अनेकजण जिममध्ये जातात आणि ही चांगली गोष्ट आहे. पण फिटनेससाठी अगदी वेडं होऊन जाणं, ही चांगली गोष्ट नाही. माणसाने त्याच्या गरजेनुसार व्यायाम केला पाहिजे. त्याने दिवसभर तेच करत राहावं असं नाही. माणसाने त्याच्या शरीरानुसार जिम वगैरे करायला हवं, याला डॉक्टर आणि तज्ज्ञही महत्त्व देतात. पण असे काही लोक आहेत जे स्वतःला फिटनेस फ्रिक म्हणवतात.
हे लोक रात्रंदिवस जिममध्ये मग्न राहतात. इतकंच नाही तर आजूबाजूच्या लोकांनाही फिट ठेवण्यासाठी धडपडत राहतात. अशाच एका घटनेत अमेरिकेतील एका माणसाला आपल्या मुलाचा लठ्ठपणा आवडला नाही. यासाठी त्यानी आपल्या मुलाला ट्रेड मिलवर एवढ्या जोरात धावायला लावलं की त्याचा मृत्यू झाला. घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
अमेरिकेतल्या एका बापाने स्वतःच्या मुलाचाच जीव घेतला. ३० एप्रिल रोजी न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होती. या सुनावणीदरम्यान कोर्ट रूममध्ये एक व्हिडिओ दाखवण्यात आला. हा व्हिडीओ 2021 मधला आहे, जिथे ख्रिस्तोफर ग्रेगर नावाचा माणूस आणि त्याचा 6 वर्षांचा मुलगा फिटनेस सेंटरमध्ये गेले होते.
advertisement
ख्रिस्तोफर ट्रेड जवळ येताच त्याने आपल्या 6 वर्षाच्या मुलाला धावण्यासाठी ट्रेडमिलवर ठेवलं. इतकंच नाही तर तो ट्रेड मिलवर चढल्यानंतर क्रिस्टोफरने वेगही वाढवला. त्यामुळे ख्रिस्तोफरचा ६ वर्षाचा मुलगा धावताना पडला. पण बापाने त्याला पुन्हा ट्रेड मिलवर चढण्यास भाग पाडलं. तो पुन्हा पडला. पडल्यानंतर तो बेशुद्ध झाल्यावर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. जिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
advertisement
ट्रेडमिलवर धावल्यानंतर क्रिस्टोफरच्या मुलाला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण तिथे त्याला वाचवता आलं नाही. ख्रिस्तोफरच्या मुलाचा शवविच्छेदन अहवाल आला तेव्हा त्यात धक्कादायक खुलासे झाले. अंतर्गत अवयवांना सूज, सेप्सिस आणि हृदय तसंच यकृताला झालेल्या दुखापतीमुळे मुलाचा मृत्यू झाला. 9 मार्च 2022 रोजी क्रिस्टोफरला त्याच्या मुलाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणी ख्रिस्तोफर ग्रेगरच्या पत्नीने त्याच्याविरुद्ध साक्ष दिली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 04, 2024 9:45 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
फिटनेससाठी बापाने हायस्पीड ट्रेडमिलवर जबरदस्ती धावायला लावलं; 6 वर्षीय चिमुकल्याचा धक्कादायक शेवट









