मुख्य आरोपी गोपाळ बदने घटनेच्या दोन दिवसांनंतर ग्रामीण पोलिसांकडे स्वत:हून हजर झाला. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फलटण दौऱ्यामुळे त्याला स्थानिक गुन्हे शाखेकडे देऊन साताऱ्याला नेण्यात आले होते. फडणवीस यांचा दौरा संपल्यानंतर संध्याकाळी सहा वाजताच्या दरम्यान त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.
...म्हणून तिने माझ्यावर आरोप केले, आरोपीचा न्यायालयात युक्तिवाद
मयत डॉक्टर युवतीने तिच्यावर कोणत्या ठिकाणावर बलात्कार झाला हे नमूद केले नाही, असे आरोपी बदनेच्या वकिलांनी युक्तिवाद केला. माझ्या अशिलावरील आरोप मोघम आहेत. त्यासाठी कोणतेही पुरावे नाहीत. मयत युवती आणि आरोपी पोलीस उपनिरीक्षक बदने यांच्यात असणाऱ्या वादातून मयत युवतीने हे आरोप केले आहेत, असे आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. आरोपी आणि मृत युवती यांच्यात काही कारणांवरून वाद होते. वादामुळेच युवतीने आरोपीवर बलात्काराचा आरोप केला, असे ठसविण्याचा प्रयत्न आरोपीच्या वकिलाने न्यायालयात केला.
advertisement
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सांगून आरोपीचे म्हणणे खोडण्याचा सरकारी वकिलांचा प्रयत्न
दुसरीकडे सरकारी वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सांगून मृत व्यक्ती कधीही खोटे बोलत नसतो असा युक्तिवाद केला. म्हणूनच यात पोलिसांना तपासासाठी वेळ मिळणे गरजेचे असल्याचे सांगत व्यक्त युवतीच्या आरोपांनुसार आरोपीची चौकशी करण्याकरिता पोलीस कोठडी मागितली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा यु्क्तिवाद ऐकून आरोपी बदनेला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
