मुंबई: फलटण येथील महिला डॉक्टरने आत्महत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रोज नव नवीन खुलासे होत आहे. या प्रकरणाची एकीकडे चौकशी सुरू आहे. तर दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी फलटण प्रकरणात महिला आयपीएस अधिकार्यांच्या नेतृत्त्वात एसआयटी गठीत करा, असे आदेशच पोलीस महासंचालकांना दिले आहे.
advertisement
फलटण इथं एका महिला डॉक्टरचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला. या महिला डॉक्टरने आत्महत्या केली असल्याचं सांगितलं जात आहे. मृत महिला डॉक्टरने मृत्यूआधी हातावर पीएसआय गोपाल बदणे आणि प्रशांत बनकर या दोघाच्याा नावाचा उल्लेख केला होता. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी पीएसआय गोपाल बदणे आणि प्रशांत बनकर यांना अटक केलीये. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना एसआयटी गठीत करण्याचे आदेश दिले आहे.
दरम्यान, याआधीही जेव्हा ही घटना समोर आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटणमधील प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ पीएसआय बदने याला निलंबित करण्याचे आदेश दिले होते. तसंच, फलटण प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले होते.
काय आहे प्रकरण?
फलटण इथं २३ ऑक्टोबर २०२५ च्या रात्री उशिरा आढळला होता. फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर महिलेचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत आढळला. मृत्यूपूर्वी डॉक्टर महिलेनं तिच्या हातावर एक चिठ्ठी लिहिली होती. त्यामध्ये तिने दोन व्यक्तींची नावं नमूद केली होती. पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदणे, याच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप तिने केला होता. तर सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या प्रशांत बनकर याच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप केला. तिने या दोघांची नावं हातावर लिहिलेली होती. या प्रकरणी दोन्ही आरोपींवर बलात्कार आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, डॉक्टरच्या कुटुंबीयांनी आणि सहकाऱ्यांनी आरोप केला आहे की, मृत डॉक्टरवर पोलीस आणि काही स्थानिक नेत्यांकडून पोस्ट-मॉर्टम अहवाल बदलण्यासाठी तसंच वैद्यकीय नोंदींमध्ये फेरफार करण्यासाठी दबाव आणला जात होता.
