पीएसआय बदणे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर रडला
दरम्यानच्या काळात पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत पीएसआय बदणे याने तोंड उघडलं आहे. तो काही तपास अधिकाऱ्यांसमोर ढसाढसा रडल्याची माहिती मिळाली आहे. त्याने आपण महिला डॉक्टरवर कसल्याही प्रकारे अत्याचार केला नाही, असं पोलिसांना सांगितलं आहे. शिवाय त्याने इतरही काही गोष्टी पोलिसांना सांगितल्या.
महिला डॉक्टरसोबतच्या संबंधावर बदणे काय म्हणाला?
advertisement
पण संबंधित डॉक्टरसोबत त्याचे काही संबंध होते का? किंवा दोघांच्या संमतीने लैंगिक संबंध ठेवण्यात आले होते का? याबाबत जेव्हा त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. त्याबाबत बदणे काहीही बोलला नाही. त्याने या सगळ्यावर अद्याप मौन बाळगल्याची माहिती आहे. त्यामुळे महिलेनं आत्महत्या करण्यापूर्वी केलेल्या बलात्काराच्या आरोपांचा तपास करण्याचं महत्त्वाचं आव्हान आता पोलिसांसमोर असणार आहे. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये खल सुरू आहे.
तपासाचं पोलिसांचं मोठं आव्हान
सध्या पीडित महिला जिवंत नाही, अशात बलात्कार झाल्याचे फॉरेन्सिक पुरावे मिळणं अवघड आहे. त्यामुळे आरोपी पीएसआय बदणे पोलीस चौकशीत नक्की काय सांगतो, यावर पुढील तपास अवलंबून असणार आहे. बदणे हा स्वत: पोलीस असल्याने संबंधित चौकशी कशी होते? याची सर्व कल्पना त्याला आहे. त्यामुळे आता वरिष्ठ पोलीस या घटनेचा तपास नक्की कसा करणार, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तूर्तास त्याने पोलीस अधिकाऱ्यांसमोर रडून आपण निर्दोष असल्याचं सांगितलं आहे. मात्र महिलेसोबत असलेल्या संबंधाबाबत अद्याप त्याने तोंड उघडलं नाही, यामुळे या प्रकरणातील सस्पेन्स वाढत चालला आहे.
