मावळ तालुक्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज ७६१ कोटी रुपयांच्या विकास कामांच्या लोकार्पणाचा सोहळा होणार आहे. यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून अनेक शासकीय अधिकारी या कार्यक्रमासाठी तालुक्यात दाखल झाले आहेत.
पोलिसांकडून शासकीय अधिकाऱ्याच्या गाडीवर दंडात्मक कारवाई
मावळ तालुका दुय्यम निबंधक अधिकारी यांचे सरकारी वाहन रस्त्यावर बेशिस्तपणे लावून वाहतुकीला अडथळा केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी थेट या शासकीय वाहनावरच ५०० रुपयाची दंडात्मक कारवाई केल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सामान्य नागरिकांनी स्वागत केले असून बेशिस्त वाहनचालकांना धडा शिकवलाच पाहिजे, असा सूर नागरिकांमधून उमटला.
advertisement
तळेगाव नगर परिषदेचे उद्घाटन
पायाभूत सोयीसुविधांनी सुसज्ज मावळ घडवूया, विकासाची गंगाजळी प्रत्येक घराघरात आणूया असे म्हणत आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांतून अजित पवार यांच्या हस्ते आज ७६१ कोटी रुपयांच्या विकास कामांच्या लोकार्पणाचा सोहळा होणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे उद्घाटन सोमवारी होत आहे. महाराष्ट्र वन विभाग आणि नॅचरल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षरोपण समारंभही सोमाटणे फाट्यावर झाला.
मावळवासीयांनी विकासाची स्वप्नं पहावीत आणि मी ती पूर्ण करावी... बस्स! ह्याच एका विश्वासावर उभी राहिलीय तळेगावच्या नगर परिषदेची भक्कम इमारत! हिचा पाया आपली सगळ्यांची एकजूट आहे आणि ह्या इमारतीचं शिखर आपल्याला प्रगतीची गगनभरारी घ्यायला बळ देणार आहे. आता थांबायचं नाही... असे सुनील शेळके यांनी समाज माध्यमांवर म्हटले आहे.
अजित पवार गैरहजेरीची शक्यता
तळेगाव नगर परिषदेच्या नुतन वास्तूचे लोकार्पण तसेच इतर ७६१ कोटींच्या कामाच्या शुभारंभासाठी मुख्य अतिथी उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सायंकाळी ५ वाजता भव्य सोहळा पार पडणार होता.