सचिन लावंड यांना कावीळ झाली होती आणि उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन लावंड हे सातारा पोलीस मुख्यालयातून काही दिवसांपूर्वीच पुसेगाव पोलीस ठाण्यात बदली होऊन आले होते. नवीन ठिकाणी रुजू झाल्यानंतर अवघ्या चारच दिवसात आजारी असल्याने रजेवर गेले. आरोग्याची तपासणी केली असता त्यांना कावीळचं निदान झाल्याचं समोर आलं. कावीळचा संसर्ग त्यांच्या संपूर्ण शरीरात पसरल्याने त्यांची प्रकृती अधिकच गंभीर बनली होती. दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
advertisement
या घटनेतील सर्वात वेदनादायक बाब म्हणजे, सचिन लावंड यांनी मृत्यू होण्यापूर्वीच आपल्या व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवलं होतं. त्यांनी स्वतःच्या फोटोसह, “दिनांक ४/१२/२०२५ रोजी सकाळी आठ वाजता सचिन लावंड, दरुज यांचा सावडण्याचा विधी आहे” असे स्पष्टपणे नमूद केले होते. हे स्टेटस बघून अनेकांना धक्का बसला.
जेव्हा हे स्टेटस पोलीस दलातील त्यांच्या सहकाऱ्यांच्या निदर्शनास आले, तेव्हा त्यांनी तत्काळ याबद्दल चौकशी करण्यास सुरुवात केली. केलेल्या चौकशीत लावंड यांच्या निधनाची ही बातमी खरी असल्याचं समोर आलं. सचिन लावंड यांच्या या अकाली निधनाने कुटुंबीय, मित्र परिवार आणि पोलीस दलातील सहकाऱ्यांना धक्का बसला आहे.
