कोणती आहे ही जबरदस्त योजना?
जर तुम्ही दर महिन्याला 50,000 रुपये RD खात्यात जमा केले, तर पाच वर्षांच्या कालावधीत तुम्ही एकूण 30 लाख रुपये जमा कराल. या रकमेसोबत तुम्हाला सुमारे 5 लाख रुपयांपर्यंत व्याज मिळेल. म्हणजेच पाच वर्षांच्या शेवटी तुमच्या खात्यात 35 लाख रुपयांची मोठी रक्कम जमा होईल.
या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ती पूर्णपणे सुरक्षित आणि जोखमीविरहित आहे. शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडमध्ये जसा धोका असतो, तसा कोणताही धोका या योजनेत नाही. पोस्ट ऑफिसकडून ठराविक आणि निश्चित व्याजदर मिळतो, त्यामुळे परतावा हमखास मिळणार हे निश्चित असते.
advertisement
तुम्हाला जर कधी अचानक पैशांची गरज भासली, तर या योजनेतून एक वर्षानंतर जमा रकमेच्या 50 टक्क्यांपर्यंत लोन घेण्याचीही सोय आहे. यामुळे तुम्हाला अकाउंट बंद न करता आवश्यक आर्थिक मदत मिळू शकते. याशिवाय, या योजनेत गुंतवणूक केल्यास कलम 80सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते. म्हणजेच गुंतवणुकीवर केवळ सुरक्षित परतावाच नाही, तर टॅक्स बचतीचाही लाभ मिळतो.
म्हणूनच ज्यांना निश्चित उत्पन्न आणि सुरक्षित गुंतवणूक हवी आहे, त्यांच्यासाठी पोस्ट ऑफिसची ही योजना एक उत्तम पर्याय ठरू शकते. नियमित बचत करून काही वर्षांतच तुम्ही लाखोंची संपत्ती निर्माण करू शकता. भविष्यासाठी आर्थिक स्थैर्य हवे असल्यास ही योजना नक्की विचारात घ्यावी.