वेब सिरीजच्या नावाखाली लहान मुलांना स्टुडिओत बोलावून ओलीस ठेवणारा रोहित आर्या पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये ठार झाला. रोहितने पोलिसांच्या दिशेनं फायरिंग करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारे यांनी लहानग्यांचा जीव वाचवण्यासाठी गोळी झाडली. यावेळी त्यांनी क्राॅस फायरिंग करत डाव्या बाजूला छातीत गोळी झाडली. पवई पोलिसांच्या शौर्यपूर्ण आणि तत्पर हालचालीमुळे 17 लहान मुलांसह एका महिलेचा जीव वाचला.
advertisement
कसा वाचवला मुलांचा जीव?
समोर आलेल्या माहितीनुसार, दुपारी पावणे दोनच्या सुमारास पवई पोलिसांना मिळाली. स्टुडिओमध्ये मुलांना ओलीस ठेवले आहे, अशी धक्कादायक माहिती मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली. आरोपीकडे एअर गन असल्याचं समजलं, तसेच त्याने कोणताही आत प्रवेश करू नये म्हणून स्टुडिओच्या सर्व खिडक्यांवर सेन्सर बसवले होते. संपूर्ण परिसराला थरकाप उडवणाऱ्या या घटनाक्रमानं तणावाचं वातावरण निर्माण झालं.
कोण आहे पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे?
पोलिसांनी इमारतीच्या मागील दरवाजातून आत प्रवेश केला. बाथरूममधून स्टुडिओमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर पोलीस आणि रोहित आर्य आमनेसामने आले. पोलिसांना पाहून रोहितने गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी देखील गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात गोळी आरोपीच्या छातीला लागली आणि तो खाली कोसळला. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारेंकडून रोहित आर्याचा एन्काऊंटर करण्यात आला. अमोल वाघमारे पवई पोलीस ठाण्यात कार्यरत होते. पोलिसांना घटनास्थळावरून एअरगन आणि केमिकल सापडले.
मृत्यूपूर्वी रोहित शेवटच्या व्हिडीओमध्ये काय म्हणाला?
मी दहशतवादी नाही. माझी पैशाची मागणी केलेली नाही. अनेक प्रयत्न झाले. अनेकांना अनेकवेळा भेटून झाले. माझे म्हणणे मजून घेतले तर बरे होईल, अनेक लोकांना हा प्रश्न आहे, त्याच सोल्युशनसाठी मला संवाद साधायचा आहे, असंही ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यने म्हटलं.
