प्रणिती शिंदे काय म्हणाल्या?
नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांचे निकाल आपल्या अपेक्षांप्रमाणे लागले नाहीत, हे सत्य आहे. अनेक महिन्यांची मेहनत, रस्त्या रस्त्यांवर फिरुन केलेला संघर्ष, लोकांपर्यंत पोहोचवलेला विचार आज आकड्यांमध्ये उतरला नाही, याची खंत प्रत्येकाच्या मनात आहे. हा पराभव वेदनादायक आहे, पण तो अंतिम नाही. बलाढ्य धनशक्ती, सत्तेचा दुरुपयोग, यंत्रणांचा गैरवापर आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या अंधारलेल्या वाटेवर या निवडणूकांना आपण सामोरे गेलो होतो. तरीही आपण शेवटच्या क्षणापर्यंत लढलो, आपल्या सोलापूरच्या भल्यासाठी संघर्ष करत राहिलो.
advertisement
राजकारणात जय-पराजय हे येत-जात असतात. मात्र कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास, निष्ठा आणि प्रामाणिकपणा हीच खरी शिदोरी असते. तुम्ही प्रत्येकाने ज्या जिद्दीने, प्रामाणिकपणे आणि न डगमगता काम केलं, ते कुठेही हरलेलं नाही. हा निकाल आपल्यासाठी आत्मपरीक्षणाची संधी आहे. लोकांच्या अपेक्षा, त्यांच्या प्रश्नांचा सूर, बदलतं सामाजिक वास्तव आपण अधिक खोलवर समजून घ्यायला हवं. या बलाढ्य धनशक्तीचा कसा सामना करायचा यावर चिंतन करायला हवं. सोलापूरचं हित हेच आपलं ध्येय असायला हवं.
आज आपण थोडं थांबू, श्वास घेऊ आणि उद्याच्या लढाईसाठी अधिक सज्ज होऊा कारण,"झुकना हमारी फितरत नहीं। दो कदम पीछे हटे हैं पर सिर्फ अगली छलांग लगाने।" तुमच्या मेहनतीला, निष्ठेला आणि संघर्षाला माझा सलाम...
