मालवणमध्ये विराट मोर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेला शिवछत्रपतींचा पुतळा अवघ्या 8 महिन्यांत कोसळला. शासन प्रसासनाच्या या भ्रष्टकारभाराचा निषेध करण्यासाठी उद्या मालवणात विराट जनसंताप मोर्चाचे आयोजन करीत आहोत. प्रत्येक शिवप्रेमीं नागरिकांच्या मनात उफाळलेला तिव्र संताप शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आणि या दुर्घटनेमागच्या सर्व सूत्रधारांना कायमची अद्दल घडविण्यासाठी उद्या बुधवार 28 ॲागष्ट रोजी सकाळी 10 वाजता मालवण भरड दत्तमंदिर येथून बाजारपेठ मार्गे तहसिलदार कार्यालयावर हा जनसंताप मोर्चा धडकणार आहे. या विराट जनसंताप निषेध मोर्चात तमाम शिवप्रेमी नागरिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असे आवाहन शिवसेना शाखा मालवण- महाविकास आघाडी व शिवप्रेमी नागरिकांच्या वतिने करीत आहोत.
advertisement
वाचा - Pune : शरद पवारांच्या भेटीत काय चर्चा झाली? हर्षवर्धन पाटलांनी स्पष्टच सांगितलं
गुन्हा दाखल करण्याचे आदेश
मालवण येथील घटनेबद्दल मंत्री रविंद्र चव्हाण यांनी माहिती दिली आहे. सिंधुदुर्गातील मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संपूर्ण कामाची तसेच निगा राखण्याची जबाबदारी ही नौदलाची होती. तसेच 20 ऑगस्टला महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी नौदलाला पत्र देखील देण्यात आलं होतं. पुतळ्यावर समुद्राच्या पाण्याची खारी हवा बसल्याने डस्ट जमा होऊन पुतळा कोसळला असावा, असा कयास रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. तर पुतळा उभारला त्यांच्यावर सुमोटो दाखल करण्याचे आदेश दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय फोडलं ही जनभावना, त्यांना ही घटना कशी घडली हे भेटून सांगेन, अशी प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण यांनी दिली.