Pune : शरद पवारांच्या भेटीत काय चर्चा झाली? हर्षवर्धन पाटलांनी स्पष्टच सांगितलं
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच आज हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली.
पुणे : माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली जवळपास अडीच तास दोन्ही नेत्यांची बैठक सुरू होती. हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीनंतर बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, मी अडीच तास पवार साहेबांसोबत होतो. आज शरद पवारांसोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही.
बावनकुळे साहेब जेष्ठ नेते आहेत. ते कोणत्या रेफरन्सने बोलले याची मला माहिती नाही. अद्याप पर्यंत मी कोणाच्या संपर्कात नाही. कोणी मला एप्रोच झालं नाही. एक गोष्ट खरे आहे की अजित पवारांचे दौरे चालू आहेत. चर्चा अशी आहे की ज्या तालुक्यात ज्याचा आमदार सीटिंग असेल त्याला तिकीट दिलं जाईल. त्यामुळे कार्यकर्त्यांचा खूप आग्रह आहे की लढावं असंही हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं.
advertisement
लोकसभा निवडणुकीच्या वेळी अजित पवार स्वतः म्हणाले की देवेंद्र फडणवीस इंदापूर तालुक्याविषयी जो निर्णय घेतील तो मान्य असेल. देवेंद्र फडणवीस ही मला म्हणाले त्यासंदर्भातला निर्णय घेईल त्यामुळे देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात, मी वाट पाहत आहे. तीन आठवड्यापूर्वी याविषयी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझे चर्चा झाली ते म्हणाले निर्णय घेऊ. आम्ही कायमच लोकांच्या मध्ये असतो आम्हाला तयारीची गरज नाही. देवेंद्र फडणवीस या संदर्भात काय भूमिका घेतात हे बघू. ते योग्य निर्णय घेतील असं म्हणत इंदापूर विधानसभेचा चेंडू हर्षवर्धन पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात टाकला.
advertisement
जनतेचा आग्रह आमच्या नेतृत्वापर्यंत पोहोचलेला आहे. वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतोय बघू. अद्याप महायुतीच्या जागा वाटपाबद्दल अंतिम निर्णय झालेला नाही. दोन्ही ज्येष्ठ नेते आहेत. त्या दोघांनी जो निर्णय घेतला त्याबाबत त्यांनी सांगावं असा माझा आग्रह आहे. महायुतीच्या जागा वाटपात संदर्भातला प्रश्न तिन्ही पक्ष घेणार आहेत एक पक्ष घेणार नाही. मी लढावं हा कार्यकर्त्यांचा, जनतेचा रेटा आहे. तो आवाज आहे आणि तो आवाज आमच्या नेत्यांपर्यंत पोहोचलेला आहे. त्यांनी निर्णय घ्यावा असं हर्षवर्धन पाटील म्हणाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 27, 2024 3:44 PM IST