Devendra Fadnavis : विधानसभेला महायुतीचा सर्वात उंच मनोरा, जो अफजलखान चालून येईल त्याचा....; फडणवीसांचा काय म्हणाले?

Last Updated:

दहीहंडीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा उपस्थित होते. यावेळी त्यांनी विधासनभा निवडणुकीबाबत मोठं भाष्य केलं.

News18
News18
मुंबई : महाराष्ट्रात सर्वच सण उत्सव मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात. आज दही हंडी मुंबईत सर्वच ठिकाणी जल्लोषात साजरी होत आहे. दहीहंडी म्हणजेच थरांचा खेळ आणि त्याला मिळालेली उत्साहाची जोड. अशा प्रकारे दही हंडी साजरी केली जाते. वरळीतील जांबोरी मैदान येथे भाजपच्या संतोष पांडे यांनी दही हंडीचे आयोजन केले आहे. अनेक दही हंडी पथकाने सहभाग घेतला आहे. या दहीहंडीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा उपस्थित होते. यावेळी त्यांनी विधासनभा निवडणुकीबाबत मोठं भाष्य केलं. विधानसभेच्या निवडणुकीत आमचा महायुतीचा मनोरा सर्वात उंच असेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
दहीहंडीच्या कार्यक्रमात मानवी थरांवर अफजलखान वधाचा देखावा सादर करण्यात आला. त्या देखाव्यावरून फडणवीसांनी विरोधकांनाही इशारा दिला. विधासनभेला आमचा मनोरा सर्वात उंच असेल. स्वराज्यावर जो जो अफजलखान चालून येईल त्याचा कोथळा बाहेर काढू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुण्यातील खराडी इथं एका महिलेचा मृतदेह शीर आणि हातपाय कापलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. महिलेचं वय ५० च्या आसपास असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. मुठा नदीत सापडलेल्या या मृतदेहामुळे खळबळ उडाली आहे. पुण्यातील या घटनेबाबत विचारले असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुण्याच्या या घटनेची चौकशी  चालू आहे.
advertisement
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी नेपाळ बस अपघातात जखमी झालेल्यांची रुग्णालयात भेट घेतली. ७ जणांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. फडणवीस यांनी या जखमींची जाऊन विचारपूस केली. यावेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर हेसुद्धा उफस्थित होते.
फडणवीस म्हणाले की, बस अपघातातील 7 जखमींपैकी तिघांवर उद्या शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी, अशा सदिच्छा त्यांना भेटून व्यक्त केल्या. उद्या आणखी 4 जखमींना मुंबईत आणण्यात येणार असून, त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. राज्य सरकारतर्फे या सर्व जखमींना सर्वतोपरी मदत करण्यात येत असून, विधी व न्याय विभागांतर्गत असलेल्या वैद्यकीय सहायता कक्षामार्फत यासाठी संपूर्ण समन्वय ठेवला जात आहे.
मराठी बातम्या/मुंबई/
Devendra Fadnavis : विधानसभेला महायुतीचा सर्वात उंच मनोरा, जो अफजलखान चालून येईल त्याचा....; फडणवीसांचा काय म्हणाले?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement