TRENDING:

Pune: दुचाकीवर तिघे होते, बसची धडक, तिघांचाही जागेवरच मृत्यू, मंचर भीमाशंकर रस्त्यावर घटना

Last Updated:

Manchar BhimaShanakar Road Accident: मोटारसायकल घोडेगाववरून मंचरच्या दिशेने जात असताना घोडेगाव शहरानजीक असणाऱ्या पळसटीका फाट्यावर बस आणि मोटार सायकलची समोरासमोर धडक झाली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सचिन तोडकर, पुणे: पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर भीमाशंकर रस्त्यावर घोडेगाव शहरानजीक खासगी प्रवासी बस आणि मोटारसायकलमध्ये झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकल वरील तीन युवकांचा जाग्यावरच मृत्यू झाला आहे.
पुणे मंचर भीमाशंकर रस्ते अपघात
पुणे मंचर भीमाशंकर रस्ते अपघात
advertisement

उत्तर प्रदेश पासिंगची खासगी प्रवासी बस ही भीमाशंकरच्या दिशेने जात होती. तर मोटारसायकल घोडेगाववरून मंचरच्या दिशेने जात असताना घोडेगाव शहरानजीक असणाऱ्या पळसटीका फाट्यावर बस आणि मोटार सायकलची समोरासमोर धडक झाली.

धडकेनंतर बसने मोटर सायकलला काही अंतर फरफटत नेले असून मोटार सायकलचा अक्षरशा चेंदामेंदा झालाय. या भीषण अपघातात मोटार सायकल वरून प्रवास करणारे आंबेगाव तालुक्याच्या कोळवाडी गावातील अथर्व खमसे, गणेश असवले, भारत वाजे या तीन युवकांचा जागेवरच मृत्यू झालाय. पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

अपघातानंतर दुचाकीची अवस्था पाहून अपघात किती तीव्रतेचा होता, हे लक्षात येते. दुचाकीवरील तिन्ही स्थानिक युवकांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune: दुचाकीवर तिघे होते, बसची धडक, तिघांचाही जागेवरच मृत्यू, मंचर भीमाशंकर रस्त्यावर घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल