बबलू सय्यद या तरुणाने गणेश काळे याच्या हत्येचे समर्थन करणारी चित्रफित तयार केली असून ती समाज माध्यमांवर प्रसिद्ध केल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचा हत्येला पाठिंबा आहे की तो स्वत: हत्या प्रकरणात सहभागी आहे? असे सवाल स्थानिक नागरिक विचारीत आहेत.
मयूर वाघमारेची MDW नावाची गुन्हेगारी टोळी
हत्येचे समर्थन करणारी Exclusive चित्रफित न्यूज १८ लोकमतच्या हाती लागली असून हत्येतील आरोपी मयूर वाघमारेची MDW नावाची गुन्हेगारी टोळी आहे. या टोळीसोबत बबलू सय्यद याचे काही कनेक्शन आहे का? या टोळीत तो काम करतो का? याचा तपास पुणे पोलीस करतील.
advertisement
पुण्यात गुन्हेगारीचे समर्थन करणारे रील तरुणांनी तयार करू नयेत नाहीतर त्यांच्यावरही गुन्हे दाखल करू, असा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे. केवळ इशारा देऊन न थांबता खरोखर काही भाईंवर गुन्हे दाखल करून त्यांना पोलिसांनी गुडघ्यावरही आणले आहे. आता बबलू सय्यद नामे तरुणाला चौकशीच्या कक्षेत घेऊन त्याला पोलीस गुडघ्यावर आणतील हे नक्की...
गणेश काळे याची हत्या कशी झाली?
आंदेकर आणि कोमकर या नातलगांमधील प्रेमाची जागा द्वेषाने घेऊन काही वर्षे लोटली आहेत. संपत्तीच्या वादावरून दोन्ही कुटुंबिय एकमेकांच्या जीवावर उठलेत. सख्ख्या नात्यांचा विसर पडून एकमेकांना कायमचे संपविण्यासाठी दोन्हीकडूनही प्रयत्न होत आहेत. यात वनराज आंदेकर आणि आयुष कोमकर या दोघांचा जीव गेला. आता एकमेकांच्या टोळीतील सदस्यही एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. दोन्ही टोळीतील टोळीप्रमुख गजाआड गेलेले असले तरी टोळ्यांच्या गुन्हेगारी कारवाया थांबलेल्या नाहीत. शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास गणेश काळे याची भर चौकात निर्घृणपणे हत्या करण्यात आली. रिक्षातून चालेल्या गणेशवर गोळ्यांचे ४ राऊंड फायर करण्यात आले. तो गतप्राण झाल्यानंतरही त्याच्यावर कोयत्याने वार केले गेले. दोन दुचाकींवरून एकूण चार आले होते. गणेश काळे हा रिक्षातून प्रवास करीत होता. खडी मशीन चौकात आरोपींनी त्याच्यावर एकूण चार गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या गणेशला लागल्या. त्यानंतर आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याला संपवले. काही क्षणात आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. पुढील काही तासांत पुणे पोलिसांनी चौघा आरोपींना बेड्या ठोकल्या.
