TRENDING:

Pune: पुण्यात टेम्पोची रिक्षाला जोरदार धडक, तीन कामगारांचा जागीच मृत्यू

Last Updated:

चाकणच्या कल्याणी हॉटेलजवळील अपघातात तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: चाकण–तळेगाव महामार्गावर महाळुंगे नजीक अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला टेम्पोची जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात तीन कामगारांचा मृत्यू झाल्याचे समजते. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात रिक्षाचे नुकसान झाले आहे.
चाकण तळेगाव रोडवर अपघात
चाकण तळेगाव रोडवर अपघात
advertisement

चाकणकडून एमआयडीच्या दिशेने प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचे पुढील चाक अचानक तुटल्याने रिक्षाचे संतुलन बिघडले. त्यावेळी समोरून येणाऱ्या टेम्पोची जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला. चाकणच्या कल्याणी हॉटेलजवळील अपघातात तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रामसुंदर राम खिलावन शाखेद, पिंटू राजन बिहारा असे मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मकर संक्रांत आधीच वाढले गुळाचे दर, क्विंटलमागे एवढ्या रुपयांची वाढ,कारण काय?
सर्व पहा

चाकणमध्ये अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांची भरमसाठ संख्या आहे. रिक्षा प्रवासासाठी तीन प्रवासींची मर्यादा असताना सात पेक्षा अधिक लोक रिक्षातून प्रवास करतात. त्यामुळे अपघातात वाढ झाल्याचे चित्र आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune: पुण्यात टेम्पोची रिक्षाला जोरदार धडक, तीन कामगारांचा जागीच मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल