जालना शहरातील गूळ बाजारात दररोज 3000 ते 4000 भेली गुळाची आवक होत आहे. मागील काही दिवसांत आवक वाढली आहे. तरीदेखील गुळाचे दर तेजीत आहेत. क्विंटलमागे 200 रुपयांनी दर वाढल्याचे गूळ व्यापारी पुसराम मुंदडा यांनी सांगितले.
Success Story : फक्त 25 गुंठ्यात केली शेती, शेतकऱ्याची आता लाखात कमाई, असं काय केलं?
advertisement
बाजारात गुणवत्तेनुसार 3200 ते 4400 रुपये दर मिळत आहे. गावरान गुळाला चांगली मागणी आहे. फिकट केसरी, केसरी, गावरान अशा प्रकारच्या गुळाची आवक होत आहे. गावरान गुळाला सर्वाधिक 3800 ते 4400 रुपये दर मिळत आहे.
सध्या नुकतेच गुऱ्हाळे सुरू झाले आहे. त्यामुळे हळूहळू आवक वाढत आहे. लातूरमधील गुळाची देखील किरकोळ आवक सुरू आहे. तर आगामी काळात वेळ अमावस्या झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात गुळाची आवक होईल. हिवाळ्यात लोक लाडू बनवण्यासाठी देखील गुळाचा वापर करतात. मकर संक्रांत देखील आहे. त्यामुळे दरात तेजी आहे. संक्रांत झाल्यावर दर 200 रुपये क्विंटलने कमी होऊ शकतात, अशी माहिती गूळ व्यापारी पुसराम मुंदडा यांनी दिली.





