खेड तालुक्यातील काळेचीवाडी येथे घराच्या अंगणात चिमुकला झोक्यावर खेळत असताना बिबट्या अचानक कुत्र्याची शिकार करण्यासाठी थेट कंपाऊंडमध्ये घुसला. काही क्षणातच चिमुकल्याने प्रसंगावधान राखत घरात धाव घेतली. कुटुंबियांनी आरडाओरड केल्याने बिबट्या घाबरून पळून गेला.
बिबट्याच्या या थरारक हालचाली सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे कैद झाल्या आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिकांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
advertisement
पिंपरखेड परिसरात दहशत माजवणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात वन विभागाला यश
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड खेड मध्ये एका बिबट्याला ठार करण्यात वन विभागाला यश आले आहे. रात्री थर्मल ड्रोनच्या साहाय्याने तपास सुरु असताना बिबट्याने हल्ला केलेल्या घटनास्थळापासून तब्बल 400 ते 500 मीटर अंतरावर बिबट्याचा ठाव लागला. टीमने त्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. त्यामुळे चवताळलेल्या बिबट्याने प्रतिहल्ला सुरू करताच शार्प शूटरने केलेल्या गोळीबारात बिबट्या जागीच ठार झाला.
