1969 साली म्हणजेच महाराष्ट्रात लॉटरी सुरू झाल्या त्याच काळात, आपल्यालाही एकदातरी लॉटरी लागावी या स्वप्नातून तिकीट खरेदी सुरू केली. वयाच्या 22 व्या वर्षी सुरू झालेला हा प्रवास आज 2025 मध्येही कायम आहे. या काळात त्यांनी 50 पैशांपासून 500 रुपयांपर्यंतच्या लॉटरी तिकिटांचा संग्रह केला आहे. काही तिकिटे सण-उत्सवांवर आधारित आहेत, काहींवर वन्यप्राण्यांचे, अभिनेत्रींचे चित्र, तर काही तिकिटांवर सामाजिक संदेश झळकतो. प्रत्येक तिकीट हे वेगळ्या काळाचा, भावनेचा आणि आठवणींचा दस्तऐवज बनले आहे.
advertisement
शेतीला पूरक निवडला व्यवसाय, 2 गायींपासून केली सुरूवात, योगेशची महिन्याला दीड लाख उलाढाल
सूर्यवंशी सांगतात, मी गरीब घराण्यातून आलो. मोठं होण्याचं स्वप्न पाहत होतो. लॉटरी लागली तर आयुष्य बदलेल, या आशेने सुरुवात केली. पण वेळ जसजसा गेला, तसं हे स्वप्न माझा छंद बनलं. त्यांनी दर गुरुवारी आणि प्रत्येक सणानिमित्त नवं तिकीट खरेदी करण्याची सवय लावून घेतली. एकदा त्यांना 10 हजार रुपयांची लॉटरी लागली होती, मात्र तेवढ्यावर थांबले नाहीत. पन्नास वर्षांत दोन लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च लॉटरीवर झाला, पण त्याचं काही दुःख नाही, ते हसत म्हणतात.
2007 साली ते सदर्न कमांडमधून अधीक्षक पदावरून निवृत्त झाले. त्यानंतरही ते बुधवार पेठेतील दत्त मंदिरात पार्ट टाईम काम करत राहिले. त्या काळात त्यांनी लॉटरी खरेदी करण्याचा छंद कायम ठेवला. आज या संग्रहात पाच लाखांपासून 51 लाखांपर्यंतच्या बक्षिसांच्या विविध लॉटऱ्या आहेत.
त्यांची इच्छा आहे की सरकारने त्यांचा हा संग्रह स्वीकारून संग्रहालयात प्रदर्शित करावा, जेणेकरून पुढच्या पिढ्यांनाही या इतिहासाची जाणीव व्हावी. तरुण पिढीला संदेश देताना ते म्हणतात, कोणतीही गोष्ट मर्यादेत केली पाहिजे. लॉटरी, गेमिंग यांचा अतिरेक करू नका. माझ्यासाठी ही आवड होती, व्यसन नव्हे.





