या प्रकरणी धंगेकर यांना एकनाथ शिंदे यांनी समज दिल्याचं देखील वृत्त समोर आलं होतं. पण धंगेकर यांनी आपला पवित्रा बदलला नाही. ते सातत्याने महायुतीतील नेत्यांना टार्गेट करत राहिले. आता पुण्यातील जैन बोर्डींगच्या जमीन घोटाळ्यावरून ते सातत्याने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना टार्गेट करत आहेत. त्यांनी मोहोळ यांच्यावर जमीन हडपल्याचा आरोप केला आहे. या आरोपानंतर आता पुन्हा एकदा धंगेकर यांना पक्षातून काढून टाकलं जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेवर स्वत: रवींद्र धंगेकर यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट करत भाष्य केलं आहे.
advertisement
काय म्हणाले रवींद्र धंगेकर?
रवींद्र धंगेकर यांनी नाव न घेता पुन्हा एकदा मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधला आहे. ते एक्सवरील पोस्टमध्ये म्हणाले की, 2024 ला एक जण मीडियामध्ये बातम्या पेरून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आला होता. तो कोण आहे, हे आदरणीय फडणवीस साहेबांना माहीत आहे. आज तोच घोटाळ्यातून वाचण्यासाठी माझ्यावर पक्ष कारवाई झाल्याच्या बातम्या खोट्या बातम्या पेरतोय..! मन में हैं विश्वास..! हम होंगे कमयाब...!!, अशी पोस्ट धंगेकर यांनी केली आहे. या पोस्ट त्यांनी #SaveHDN आणि #punelandscam असे दोन हॅशटॅग वापरले आहेत. शिवाय त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही यात टॅग केलं आहे.
एकीकडे रवींद्र धंगेकर यांच्यावर कारवाई होणार असल्याची चर्चा सुरू असताना आता धंगेकर यांनी स्वत: पोस्ट करून संबंधित बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं आहे. याआधीही धंगेकर यांनी ट्वीट करत एकनाथ शिंदे आपल्यावर अन्याय होऊ देणार नाहीत, अन्यायाविरोधात लढण्यासाठी त्यांचं पाठबळ नेहमी राहील, असं त्यांनी म्हटलं होतं. आता या नव्या ट्वीटमुळे पुण्यातील धंगेकर विरुद्ध मोहोळ वादात नवा ट्विस्ट बघायला मिळत आहे.