TRENDING:

Pune News: पुण्यात 'खाकी' डागाळली; बंडगार्डन पोलीस ठाण्यातच लाच मागणारा मासा लागला गळाला, प्रकरण काय?

Last Updated:

Pune News: कायद्याचे रक्षकच गुन्हेगारी कृत्यात पुढाकार घेतात तेव्हा खाकी वर्दीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहते. पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे: कायद्याचे रक्षकच गुन्हेगारी कृत्यात पुढाकार घेतात तेव्हा खाकी वर्दीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहते. पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तक्रारदाराविरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी २ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संदीप खेडकर यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यात 'खाकी' डागाळली; बंडगार्डन पोलीस ठाण्यातच लाच मागणारा मासा लागला गळाला, प्रकरण काय?
पुण्यात 'खाकी' डागाळली; बंडगार्डन पोलीस ठाण्यातच लाच मागणारा मासा लागला गळाला, प्रकरण काय?
advertisement

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्तीच्या विरोधात एका इसमाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फसवणुकीचा अर्ज दिला होता. या अर्जाची चौकशी पोलीस उपनिरीक्षक संदीप खेडकर (रा. वानवडी) यांच्याकडे होती. या चौकशीत तक्रारदाराला वाचवण्यासाठी आणि त्याच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी खेडकर यांनी २ लाख रुपयांची मागणी केली.

'एसीबी'चे जाळे आणि तडजोड

लाचेच्या मागणीने त्रस्त झालेल्या तक्रारदाराने ३ फेब्रुवारी रोजी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. 'एसीबी'ने या तक्रारीची अत्यंत गोपनीयरीत्या पडताळणी केली. या पडताळणी दरम्यान खेडकर यांनी स्वतःसाठी आणि आपल्या वरिष्ठांसाठी म्हणून तडजोड केली आणि अखेर १ लाख रुपये घेण्याचे मान्य केले.

advertisement

वरिष्ठांचेही नाव आल्याने खळबळ

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
AI चा खास कोर्स मोफत शिका! पिंपरी चिंचवडमध्ये कुठे करायची नावनोंदणी?
सर्व पहा

पडताळणीत खेडकर यांनी केवळ स्वतःसाठीच नव्हे, तर 'वरिष्ठांसाठी' देखील पैसे हवे असल्याचे सांगितल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. तडजोडीअंती १ लाख रुपये मागितल्याचे निष्पन्न होताच, एसीबीने संदीप खेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत असून, यात आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune News: पुण्यात 'खाकी' डागाळली; बंडगार्डन पोलीस ठाण्यातच लाच मागणारा मासा लागला गळाला, प्रकरण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल