जखमीची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये सिद्दिकी मोहम्मद मुजमील हाजी आणि मोहम्मद शकील मोहम्मद हाजी यांना गंभीर मारहाण झाली. मारहाणी दरम्यान गंभीर जखमी झालेल्या सिद्दिकी मोहम्मद मुजमील हाजी यांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रांजणगाव पोलीस स्टेशनमध्ये दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. केवळ गाडीचा धक्का लागला म्हणून एवढी गंभीर मारहाण झाली की एकाचा यात मृत्यू झाला.
advertisement
नेमकी घटना काय?
कारेगाव येथे मोहम्मद शकिल मोहम्मद हाजी आणि त्याचा भाऊ सिध्दिकी मोहम्मद मुजम्मील मोहम्मद हाजी दोन्ही (रा. यशईन चौक, कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. चैतन्यनगर, नांदेड) हे रोडने पायी जात असताना त्यांना पाठीमागून स्कुटीवरुन येणारे ओंकार वाळके आणि त्याचा अनोळखी साथीदार याच्या स्कुटीचा धक्का लागल्याने, त्याचा जाब विचारलेच्या कारणावरुन त्याचा राग मनात धरून ४ जानेवारीला अडीच दरम्यान त्यांचे राहते ठिकाणी ओंकार वाळके आणि त्याचे साथीदार यांनी मोहम्मद शकील आणि त्याचा भाऊ सिध्दिकी मोहम्मद, यांना लाकडी दांडके, प्लास्टिक पाईप आणि हाताने मारहाण करुन सिध्दिकी मोहम्मद यास जीवे ठार मारले.
मोहम्मद शकील यास किरकोळ व गंभीर दुखापत केली होती सदर बाबत जखमी मोहम्मद शकिल मोहम्मद हाजी, रा. यशईन चौक, कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. चैतन्यनगर, नांदेड याचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी हे घटनास्थळावरून गुन्हा केले आणि नंतर फरार झाले होते.
गुन्हा घडले ठिकाणी श्री रमेश चोपडे सो, अप्पर पोलीस अधिक्षक, श्री प्रशांत ढोले उपविभागिय पोलीस अधिकारी व रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक महादेव वाघमोडे यांनी भेट दिलेली आहे. वरिष्ठांनी आरोपी तात्काळ अटक करणे बाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तपास पथकातील सहा फौज दत्तात्रय शिंदे, पो हवा ब्रम्हा पोवार, पो हवा अभिमान कोळेकर, पो हवा विजय सरजिने, पो काँ योगेश गुंड, पो काँ गणेश वाघ, यांना योग्य त्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तपास पथकाने फरार आरोपींचे ठावठिकाणी जाऊन त्यांचा शोध सुरू होता. आरोपींचा शोध सुरु असताना गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी ओमकार सिताराम वाळके, विजय ज्ञानेश्वर जगधने दोन्ही (रा कारेगाव, ता. शिरुर जि पुणे) यांना तात्काळ अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.