पुण्यात टोळीयुद्ध भडकलेले असताना आणि ठराविक काळानंतर कोयता गँगचा नंगा नाच होत असताना पुण्याच्या उपनगरांतही गुन्हेगारी टोळकी सक्रीयपणे काम करीत आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे.
मृत व्यक्ती आणि आरोपी दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार, पोलीस आरोपीच्या शोधात
मृत व्यक्ती आणि आरोपी दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. वाघोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी हल्ल्यानंतर पसार झाला आहे. सध्या वाघोली पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
advertisement
वाघोली परिसरातील लोक खुनाच्या घटनेने हादरले आहेत. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथके नियुक्त केली असून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील विविध मार्गांवर चौकशी सुरू आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 05, 2025 10:20 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पुण्यात रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा मित्राकडूनच खून, प्यासा हॉटेलसमोर मध्यरात्री थरार, गुन्हेगार पसार