TRENDING:

लक्ष्मी फक्त घरात नाही तर शेतातही वसते! पुरंदरच्या आडाच्यावाडीत अनोख्या पद्धतीने लक्ष्मीपूजन

Last Updated:

शेतकऱ्यांनी आपल्याला वर्षभर उत्पन्न देणाऱ्या अंजीर आणि अन्य फळझाडांची पूजा करून निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जितेंद्र जाधव, प्रतिनिधी, पुरंदर : दिवाळी म्हटलं की घरांची सजावट, बाजारातली गर्दी आणि लक्ष्मीपूजनाची लगबग असते. पण आडाचीवाडीसारख्या ग्रामीण भागात दिवाळीचा उत्सव वेगळाच असतो. इथे लक्ष्मी फक्त घरात नाही, तर शेतातही वसते. इथल्या शेतकऱ्यांनी आपल्या फळबागांना वंदन करत, झाडांची पारंपरिक पद्धतीने पूजा करत लक्ष्मीपूजन साजरं करत निसर्गाशी नातं घट्ट केलं.
आडाचीवाडी लक्ष्मीपूजन
आडाचीवाडी लक्ष्मीपूजन
advertisement

कृषीप्रधान संस्कृतीत शेतातील ‘काळ्या आई’चं महत्व मोठं आहे. येथे शेतकऱ्यांनी आपल्याला वर्षभर उत्पन्न देणाऱ्या अंजीर आणि अन्य फळझाडांची पूजा करून निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. महिलांनी सुवासिनी वेशात झाडांना ओवाळून त्यांचं पूजन केलं. अनेक कुटुंबांनी अंजिराच्या बागांमध्ये दिव्यांची सजावट करत फटाक्यांच्या आतषबाजीत लक्ष्मीपूजन पार पाडलं.

पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडीसह वाल्हे येथील बापसाईवस्ती आणि हनुमानवस्ती परिसरामध्ये वर्षभर शेतामधुन विविध पिकांबरोबरच अंजिराचे मोठ्या प्रामाणावर उत्पन्न घेतले जाते. त्यामुळे येथे फळबागांना लक्ष्मीचे रूप मानुन अगोदर शेतात पूजा होते. दरवर्षी लक्ष्मीपुजनाच्या दिवशी सायंकाळी शेतातील काळ्या आईला वंदन करुन परिसरातील प्रत्येक फळबाग उत्पादक शेतकऱ्यांसह सुवासिनी झाडांची विधीवत पूजा होते आणि नंतर घरातील लक्ष्मीपूजन साजरं केलं जातं. ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने पाळली जाते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोनं महागलंय, दिवाळीत घ्या हटके अन् स्टायलिश ज्वेलरी, किंमत फक्त 145 रुपयांपासून
सर्व पहा

अंजिराच्या झाडांच्या पुजनानंतरच येथील शेतकरी आपापल्या घरातील लक्ष्मीपुजन साजरे करण्याची परंपरा आजही कायम जपत आहेत. आजचा लक्ष्मीपुजनाचा मुहर्त साधत अनेक कुटूंबियांनी या परंपरेचे पालन केले. दरम्यान सायंकाळी येथील परिसरातील अंजिरासह फळबागांमधुन दिव्यांच्या लखलखाटासह फटाक्यांच्या आतषबाजीने जणू लक्ष्मी अवतरल्याचे दिसून येत होते.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लक्ष्मी फक्त घरात नाही तर शेतातही वसते! पुरंदरच्या आडाच्यावाडीत अनोख्या पद्धतीने लक्ष्मीपूजन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल