कोकण स्पेशल मटकी मिसळ आता मुंबईत, किंमत फक्त 50 रुपये, इथं घ्या आस्वाद
7.72 लाख ई- वाहनांमध्ये, 6.36 लाख इतक्या दुचाकींची विक्री झाली आहे, तर इतरत्र कार आणि रिक्षाची विक्री झालेली आहे. 80 टक्क्यांहून अधिक दुचाकी वाहनांची विक्री आतापर्यंत करण्यात आली आहे. स्वॅपिंग सुविधा आणि सबसिडीमुळे वाहनचालक कारपेक्षा दुचाकीकडेच जास्त आकर्षित होत आहेत. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 81 हजार ई- दुचाकींची नोंदणी झाली आहे. तर, 4 वर्षात 6 लाखांहून अधिक नागरिकांनी ई- बाईकला पसंती दिली आहे. इलेक्ट्रिक वाहन खरेदीच्या प्रोत्साहनाला सरकारने सबसिडी आणि आरटीओ नोंदणी शुल्क माफ केले आहे.
advertisement
मुकाई चौकातील बीआरटी मार्ग खुला होणार की नाही? महत्त्वाची माहिती आली समोर
2025 मध्ये लागू झालेल्या नवीन इलेक्ट्रिक वाहन खरेदीच्या धोरणात दुचाकी खरेदीवर 10% म्हणजे 30 हजारांपर्यंत सवलत देण्यात आले आहे. तर, एक लाख ई-दुचाकींसाठी ही सवलत लागू असून यापैकी 81,420 नोंदणी आधीच पूर्ण झाली आहे. नोंदणी वाढत असली तरी अनेक ग्राहक ई-वाहन खरेदीपासून दूर आहेत. बॅटरी रेंज, चार्जिंगचा वेळ, अधिक किंमत, सर्व्हिसिंग सुविधा आणि सोसायट्यांमध्ये चार्जिंग पॉइंटची कमतरता ही कारणे आहेत. बदलत्या टेक्नॉलॉजीमुळे अनेक जण ती स्थिर होण्याची वाट पाहत आहेत.
वाहनचालकांनो काळजी घ्या! पुणे-मुंबई महामार्गावरील 'हे' ठिकाण ठरतयं अपघातांचं हॉट
2021- 22 मध्ये इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचे टक्के, 2.8 टक्के इतके होते. 2024- 25 मध्ये 8. 34 टक्के पर्यंत होते. तर चालू वर्षी म्हणजेच, 2025- 26 मध्ये हा आकडा काही प्रमाणावर वाढला आहे. 8.61 टक्के इतका इलेक्ट्रिक वाहन आतापर्यंत खरेदी करण्यात आले आहे. पेट्रोल- डिझेलच्या वाहनांचा खरेदी आकडा दिवसेंदिवस कमी होत आहे. त्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांची खरेदीची संख्या वाढत आहे.