परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान विटंबनेच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. त्यावेळी पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीला ताब्यात घेतले होते. यानंतर सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. हा मृत्यू पोलिसी बळामुळं झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी आणि आंबेडकरी चळवळीने केला होता.
राज्याच्या हिवाळी अधिवेशनातही विरोधकांनी बीडमधील संतोष देशमुख प्रकरण आणि परभणीचा मुद्दा उपस्थित करत आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी निवेदन विधानसभेत केले होते.
advertisement
पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन...
परभणीमध्ये अशोक घोरबांड या पोलीस अधिकाऱ्याने वाजवीपेक्षा अधिक बळाचा वापर केला असल्याची तक्रार समोर आली. त्यानंतर माहिती घेतल्यानंतर अशोक घोरबांड यांची चौकशी करण्यात येणार आहे. तोपर्यंत घोरबांड यांना निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. पोलिसांनी परभणीत कोम्बिंग ऑपरेशन करत निरपराध लोकांना बळीचा बकरा करत असल्याचा आरोप करण्यात आला.
राहुल गांधींसोबत काँग्रेस नेत्यांची हजेरी...
राहुल गांधी यांच्यासोबत महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार अमित देशमुख, खासदार रविंद्र चव्हाण, खा. डॉ. कल्याण काळे, डॉ. शिवाजी काळगे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश वरपुडकर, मागासवर्गीय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
