बोपदेव घाटातील एका लॉजमध्ये दोन बांगलादेशी तरुणींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी बोपदेव घाटातील लॉजवर छापा टाकून मोठी कारवाई केली. ज्यावेळी पोलिसांनी छापा टाकला, तेव्हा लॉजमधील दृश्य पाहून पोलीसही हादरले. या छाप्यात देहविक्रीसाठी आणलेल्या दोन बांगलादेशी तरुणींना ताब्यात घेण्यात आलं. या गंभीर प्रकरणी लॉजचा व्यवस्थापक आणि एका कामगाराला अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कोंढवा पोलिसांनी बोपदेव घाटातील एका लॉजवर अचानक छापा टाकला. हा लॉज अनेक दिवसांपासून देहविक्रीचा अड्डा बनला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून केलेल्या या कारवाईत दोन बांगलादेशी तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीमध्ये समोर आलं की, या तरुणींना पैशांचं आमिष दाखवून आणि जबरदस्तीने देहविक्री करण्यास प्रवृत्त केलं जात होतं.
लॉज व्यवस्थापकासह दोघांना अटक
या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ सूत्रधार असलेल्या दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये लॉजचा व्यवस्थापक रवी छोटे गौडा आणि लॉजवर काम करणारा कामगार सचिन प्रकाश काळे यांचा समावेश आहे. हे दोघेही या बांगलादेशी तरुणींकडून देहविक्री करून घेत होते. तसेच ग्राहकांशी संपर्क साधून त्यांना लॉजवर बोलावून घेत होते. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
