मक्याच्या दरात वाढ
कृषी मार्केट वेबसाईटवरील सायंकाळी 6.30 वाजताच्या रिपोर्टनुसार, 15 डिसेंबर रोजी राज्याच्या कृषी मार्केटमध्ये मक्याची एकूण आवक 27 हजार 437 क्विंटल इतकी झाली. आज मक्याची सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. नाशिक मार्केटमध्ये झालेल्या 7 हजार 091 क्विंटल मक्यास प्रतीनुसार 1500 ते 2940 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. मुंबई मार्केटमध्ये आज मक्याला सर्वाधिक बाजारभाव मिळाला. मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 691 क्विंटल मक्यास कमीत कमी 2500 तर सर्वाधिक 3800 रुपये बाजार भाव मिळाला. रविवारच्या तुलनेत मक्याच्या दरात वाढ झालेली दिसून येत आहे.
advertisement
कांद्याची आवकही वाढली; दर देखील वाढीवर
राज्याच्या कृषी मार्केटमध्ये आज कांद्याची एकूण आवक 1 लाख 50 हजार 656 क्विंटल इतकी झाली. त्यातील 49 हजार 816 क्विंटल उन्हाळी कांद्याची सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 535 ते 2608 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच कोल्हापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 4663 क्विंटल कांद्यास 4000 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. रविवारी मिळालेल्या सर्वाधिक दराच्या तुलनेत कांद्याच्या दरात वाढ झाली आहे.
सोयाबीनचे दर 6 हजारवर
राज्याच्या मार्केटमध्ये आज सोयाबीनची एकूण आवक 55 हजार 323 क्विंटल इतकी झाली. सर्वाधिक आवक ही लातूर मार्केटमध्ये झाली. लातूर मार्केटमधील 23 हजार 785 क्विंटल सोयाबीनला 3518 ते 4459 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. वाशिम मार्केटमध्ये आवक झालेल्या 3300 क्विंटल सोयाबीनला 6000 रुपये इतका सर्वाधिक बाजारभाव मिळाला. रविवारी मिळालेल्या सर्वाधिक बाजार भावात वाढ झालेली दिसून येत आहे.





