TRENDING:

सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा! रेल्वे 'या' 2 गाड्यांचे डबे वाढवणार

Last Updated:

कोरोना काळात लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे सामान्य डब्यांची संख्या कमी करण्यात आली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नारायण काळे, प्रतिनिधी
गर्दी कमी होण्यास मदत मिळेल.
गर्दी कमी होण्यास मदत मिळेल.
advertisement

जलना : रेल्वे गाड्यांचे सामान्य डबे गर्दीनं खचाखच भरलेले असतात. प्रवाशांना जागा मिळाली नाही तर जनरल कोचच्या शौचालयातूनही प्रवास करण्याची वेळ येते. गाड्यांमधली हीच वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेनं आता मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये सामान्य डब्यांची संख्या वाढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तर, सध्या केवळ 2 सामान्य डबे बसवलेल्या गाड्यांची संख्या दुप्पट करण्यात येणार आहे.

advertisement

दक्षिण मध्य रेल्वेकडून येत्या काही दिवसांत हैदराबाद-मुंबई देवगिरी एक्स्प्रेस आणि आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेससह अनेक गाड्यांमध्ये आणखी 2 सामान्य डबे जोडले जाणार आहेत. त्यामुळे या दोन्ही गाड्यांना 2 ऐवजी 4 सामान्य डबे असतील. येत्या ऑगस्ट महिन्यापासून डब्यांची ही रचना बदलण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

advertisement

हेही वाचा : प्रवाशांनो लक्ष असू द्या, ट्रॅक दुरुस्तीसाठी 'ही' गाडी महिनाभर रद्द!

View More

कोरोना काळात लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे सामान्य डब्यांची संख्या कमी करण्यात आली. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतरही रेल्वेकडून सामान्य डबे वाढवण्यात आले नव्हते. त्यानंतर आता पुन्हा एकदा रेल्वेत डब्यांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचं कळतं आहे.

advertisement

येत्या महिन्यापासून बदल!

मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्टमध्ये गाड्यांच्या डब्यांमध्ये बदल करण्यात येणार आहे. ज्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अधिक डबे असतील त्यात बदल केला जाईल. गाड्यांमधून 2 वातानुकूलित डबे काढून त्याजागी स्लीपर किंवा सामान्य डबे लावले जाणार आहेत. तसंच येत्या ऑगस्ट महिन्यापासून दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड मंडळातून धावणाऱ्या 2 गाड्यांच्या डब्यांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

advertisement

प्रवाशांना दिलासा!

देवगिरी आणि नंदीग्राम एक्स्प्रेसच्या सामान्य डब्यात प्रवाशांना उभं राहण्याससुद्धा जागा मिळत नाही. सामान्य डब्यात 72 प्रवाशांना बसण्याची व्यवस्था असते. परंतु प्रवास मात्र दीडशेपेक्षा जास्त प्रवासी एका डब्यातून करतात. म्हणूनच दोन्ही गाड्यांमध्ये 4 डबे सामान्य ठेवण्यात येणार असल्यानं प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. तसंच गर्दी कमी होण्यासही मदत मिळेल.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा! रेल्वे 'या' 2 गाड्यांचे डबे वाढवणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल