प्रवाशांनो लक्ष असू द्या, ट्रॅक दुरुस्तीसाठी 'ही' गाडी महिनाभर रद्द!
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) इथं पायाभूत कामांसाठी 1 ते 30 जुलैपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. इथल्या यार्डमधील रेल्वेगाड्यांची देखभाल, दुरुस्ती करणाऱ्या मर्यादित मार्गिकेचं काम करण्यात येणार आहे.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : मुंबईहून सोलापुरात जाणाऱ्या आणि सोलापूरहून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती आहे. सोलापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस गाडी (Mumbai LTT Express) 30 जुलैपर्यंत म्हणजे संपूर्ण महिनाभर रद्द करण्यात आलीये.
लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) इथं पायाभूत कामांसाठी 1 ते 30 जुलैपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. इथल्या यार्डमधील रेल्वेगाड्यांची देखभाल, दुरुस्ती करणाऱ्या मर्यादित मार्गिकेचं (पिट लाइन) काम करण्यात येणार आहे. त्यामुळे विविध गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर अनेक गाड्यांचे थांबे बदलले आहेत. त्याचाच फटका आता प्रवाशांना बसणार आहे.
advertisement
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून धावणारी 01435 सोलापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी 2, 9, 16, 23 आणि 30 जुलै रोजी (5 फेऱ्या) रद्द करण्यात आली आहे. तर, 01436 लोकमान्य टिळक टर्मिनस-सोलापूर ही गाडी 3, 10, 17, 24, 31 जुलै रोजी (5 फेऱ्या) रद्द करण्यात आलीये. त्यामुळे प्रवाशांनी याची नोंद घेऊन आपला प्रवास सुखकर करण्यासाठी गाड्यांचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
advertisement
दरम्यान, 30 जूनपासून पूर्ण महिनाभर मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेस एलटीटीऐवजी पनवेलपर्यंतच धावतील आणि पनवेलवरूनच सुटतील. कोकणवासीयांसाठी या दोन्ही गाड्या महत्त्वाच्या आहेत.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
June 29, 2024 12:45 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
प्रवाशांनो लक्ष असू द्या, ट्रॅक दुरुस्तीसाठी 'ही' गाडी महिनाभर रद्द!