advertisement

नशिबाचे धनी! 27 नक्षत्रांपैकी 'या' 3 नक्षत्रात जन्मलेले लोक कमावतात अफाट संपत्ती, तुम्हीही आहात का लकी?

Last Updated:

ज्योतिषशास्त्रामध्ये जन्मलग्नासोबतच 'जन्म नक्षत्राला' अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यक्तीचा स्वभाव, त्याचे भविष्य आणि आर्थिक स्थिती ही तो कोणत्या नक्षत्रावर जन्माला आला आहे, यावर अवलंबून असते.

News18
News18
Lucky Nakshatra : ज्योतिषशास्त्रामध्ये जन्मलग्नासोबतच 'जन्म नक्षत्राला' अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यक्तीचा स्वभाव, त्याचे भविष्य आणि आर्थिक स्थिती ही तो कोणत्या नक्षत्रावर जन्माला आला आहे, यावर अवलंबून असते. आकाशमंडळातील 27 नक्षत्रांपैकी काही नक्षत्रे अशी आहेत, जी व्यक्तीला 'कुबेरासारखी' श्रीमंती आणि समाजात मान-सन्मान मिळवून देतात. ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, पूर्वाभाद्रपद, अनुराधा आणि धनिष्ठा या तीन नक्षत्रांत जन्मलेल्या व्यक्तींच्या नशिबात अपार धनदौलत लिहिलेली असते. या नक्षत्रांचे अधिपती ग्रह अशा काही स्थितीत असतात की, त्या व्यक्तीला आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
या नक्षत्रांमध्ये जन्मलेले भाग्यवान असतात
धनिष्ठा नक्षत्र
'धनिष्ठा' या शब्दाचा अर्थच 'सर्वात धनवान' असा होतो. हे नक्षत्र मंगळ ग्रहाच्या अधिपत्याखाली येते. या नक्षत्रात जन्मलेले लोक अत्यंत ऊर्जावान आणि तेजस्वी असतात. त्यांना संगीत आणि कलेची आवड असते. धनिष्ठा नक्षत्राचे लोक शून्यातून विश्व निर्माण करण्याची क्षमता ठेवतात. हे लोक केवळ स्वतःसाठीच नव्हे, तर परोपकारी कामातही मोठे धन खर्च करतात. मंगळाच्या प्रभावामुळे त्यांना स्थावर मालमत्ता आणि जमिनीतून मोठा फायदा होतो.
advertisement
पूर्वाभाद्रपद नक्षत्र
या नक्षत्राचा स्वामी 'गुरू' आहे. गुरू हा ज्ञानाचा आणि विस्ताराचा कारक ग्रह आहे. या नक्षत्रात जन्मलेले लोक अत्यंत बुद्धिमान आणि तत्त्वज्ञानी असतात. त्यांच्याकडे दूरदृष्टी असते. गुरूच्या प्रभावामुळे हे लोक अध्यात्म, शिक्षण किंवा सरकारी नोकरीत उच्च पद भूषवतात. त्यांना वारसाहक्काने संपत्ती मिळण्याचे योग जास्त असतात. या व्यक्ती पैशांपेक्षा आपल्या नावलौकिकाला जास्त महत्त्व देतात, पण तरीही त्यांच्याकडे संपत्तीची कधीच उणीव राहत नाही.
advertisement
अनुराधा नक्षत्र
हे नक्षत्र शनिदेवाच्या मालकीचे असून याची देवता 'मित्र' आहे. हे यश आणि स्थिरतेचे प्रतीक मानले जाते. या नक्षत्रातील व्यक्ती खूप कष्टाळू आणि शिस्तप्रिय असतात. त्यांना घरापासून दूर किंवा परदेशात जास्त यश मिळते. सुरुवातीच्या काळात संघर्ष करावा लागला तरी, वयाच्या 30-32 नंतर यांचे नशीब सोन्यासारखे चमकते. हे लोक व्यवसायात खूप यशस्वी होतात आणि गुंतवणुकीतून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करतात. 'मैत्री' आणि 'सहकार्य' ही त्यांच्या यशाची गुरुकिल्ली असते.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
नशिबाचे धनी! 27 नक्षत्रांपैकी 'या' 3 नक्षत्रात जन्मलेले लोक कमावतात अफाट संपत्ती, तुम्हीही आहात का लकी?
Next Article
advertisement
मोमो स्टॉलवर झाला सौदा, एका चुकीने कुटुंब रस्त्यावर; सातवीतल्या मुलाची चटक महागात पडली, कपाट उघडताच पायाखालची जमीन सरकली
मोमो स्टॉलवर झाला सौदा, एका चुकीने कुटुंब रस्त्यावर; मुलाची चटक महागात पडली
  • पालकांनो सावधान!

  • तुमच्या मुलाच्या 'खाण्याच्या सवयी' तर घराला कंगाल करत नाहीत ना?

  • 'फ्री मोमोज' आणि 85 लाखांचे दागिने

View All
advertisement