Wari 2024: पुण्यात कोणते रस्ते बंद, पर्यायी मार्ग कुठले? संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Last Updated:

पालखी सोहळ्यासाठी शहरातील प्रमुख रस्ते रविवारी दुपारनंतर आवश्‍यकतेनुसार वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे.
वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : आषाढी एकादशीला आता काहीच दिवस उरले आहेत. विठूरायाच्या भेटीसाठी व्याकुळ झालेले वारकरी आता श्री संत महाराजांच्या पालख्यांसंगे पंढरपूरच्या वाटेवरून पायी चालू लागले आहेत. श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं रविवार दिनांक 30 जून रोजी पुण्यात आगमन होणार असून मुक्कामही असणार आहे. या सोहळ्यासाठी शहरातील प्रमुख रस्ते रविवारी दुपारनंतर आवश्‍यकतेनुसार वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
advertisement
श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पिंपरी-चिंचवड इथून रविवारी दुपारनंतर पुण्यात दाखल होणं नियोजित आहे. त्यामुळे बोपोडी चौक, खडकी रेल्वे स्थानक, मरिआई गेट चौक, कमल नयन बजाज चौक, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाकडेवाडीपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद असेल. तर, श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी कळस फाटा ते विश्रांतवाडी चौक, येरवड्यातील मनोरुग्णालय (मेंटल कॉर्नर) ते आळंदी रस्ता चौक, चंद्रमा चौक ते आळंदी रस्ता, नवीन डॉ. आंबेडकर सेतू ते चंद्रमा चौक, होळकर पूल ते साप्रस चौकीपर्यंत वाहतूक बंद राहील. या कालावधीत आळंदीकडे जाणारे रस्ते बंद राहतील. तर इतर रस्ते सुरू असतील.
advertisement
पाटील इस्टेट परिसरापासून दोन्ही पालख्या एकाच मार्गावरून मुक्कामस्थळी पोचतील. अभियांत्रिकी महाविद्यालय चौक, संचेती चौक, वेधशाळा चौक, वीर चाफेकर चौक, ज्ञानेश्वर पादुका चौक, तुकाराम पादुका चौक, गोखले स्मारक चौक (गुडलक), खंडोजी बाबा चौक, टिळक चौक, लक्ष्मी रस्ता, विजय चित्रपटगृह चौक, सेवासदन चौक, बेलबाग चौक, बुधवार चौक, पासोड्या विठोबा मंदिर, मोती चौक, सोन्या मारुती चौक, हमजेखान चौक, डुल्या मारुती चौक, नाना पेठ पोलीस चौक इथून श्री संत तुकाराम महाराजांची पालखी अरुणा चौकमार्गे नाना पेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल. तर, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी अशोका चौकमार्गे भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिर इथं मुक्कामास येईल. पालख्यांच्या मुक्कामानिमित्त नाना-भवानी पेठेतील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत.
advertisement
पालखी आगमन व मुक्कामामुळे वाहतुकीस बंद रस्ते आणि पर्यायी मार्ग:
  • गणेशखिंड रस्ता (रेंजहिल्स कॉर्नर चौक ते संचेती रुग्णालय) पर्यायी मार्ग : रेंजहिल्स-खडकी पोलीस ठाणे, पोल्ट्री चौक, जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि रेंजहिल्स, सेनापती बापट रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता
  • फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता (खंडोजीबाबा चौक ते वीर चाफेकर चौक) पर्यायी मार्ग : कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, रेंजहिल्स
  • छत्रपती शिवाजी महाराज रस्ता (गाडगीळ पुतळा ते स. गो. बर्वे चौक) पर्यायी मार्ग : कुंभार वेस, मालधक्का चौक, आरटीओ चौक, जहांगीर हॉस्पिटल, बंडगार्डन रस्ता
  • टिळक चौक ते वीर चाफेकर चौक, पर्यायी मार्ग : शास्त्री रस्ता, म्हात्रे पूल
  • लक्ष्मी रस्ता (बेलबाग चौक ते टिळक चौक) पर्यायी मार्ग : शिवाजी रस्ता, हिराबाग टिळक रस्ता, शास्त्री रस्ता
  • शास्त्री रस्त्यावरील सेनादत्त पोलीस चौकी ते खंडोजीबाबा चौक रस्ता बंद
advertisement
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Wari 2024: पुण्यात कोणते रस्ते बंद, पर्यायी मार्ग कुठले? संपूर्ण माहिती एका क्लिकवर
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement