वाह, चक्क मॉलमध्ये साकारली वारी! पुण्यात...आणि कुठं

Last Updated:

खास देखाव्यासाठी पंढरपुरात जाऊन पांडुरंगाचं हुबेहूब चित्र रेखाटून अगदी तशीच मूर्ती तयार करण्यात आली. तसंच 2 हजार वारकरीही तयार केले आहेत.

+
पुणे

पुणे शहराची ओळखच सांस्कृतिक शहर अशी आहे.

प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : मॉल म्हणजे फक्त श्रीमंतांसाठीचं शॉपिंग सेंटर, असा अनेकजणांचा गैरसमज असतो. शिवाय मॉल म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर पाश्चिमात्य संस्कृती येते. अशातच संस्कृती जपण्याच्या बाबतीत अग्रेसर असलेल्या पुण्यात एक अत्यंत अनोखं आणि सुंदर दृश्य पाहायला मिळतंय. पिंपरी-चिंचवडच्या एल्प्रो (Elpro) मॉलमध्ये वारीचा अतिशय आकर्षक असा देखावा तयार करण्यात आलाय. सध्या परिसरात हा प्रचंड चर्चेचा विषय ठरला आहे.
advertisement
विशेष म्हणजे महाराष्ट्रात साजरे केले जाणारे सर्व मोठे सार्वजनिक सण-उत्सव विविध देखाव्यांमधून या मॉलमध्ये साकारले जातात. सध्या वारकरी बांधवांना विठुरायाच्या भेटीची ओढ लागली आहे. वारीची जोरदार तयारी सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा वारीचा देखावा तयार करण्यात आलाय.
advertisement
पुणे शहराची ओळखच सांस्कृतिक शहर अशी आहे. आपल्या संस्कृतीची ओळख पुढच्या पिढीलाही व्हावी यासाठी या मॉलकडून नेहमीच पुढाकार घेतला जातो. इथं वारीचा देखावा साकारण्यासाठी कमीत कमी 3 महिन्यांचा कालावधी लागला.
खास देखाव्यासाठी पंढरपुरात जाऊन पांडुरंगाचं हुबेहूब चित्र रेखाटून अगदी तशीच मूर्ती तयार करण्यात आली. तसंच 2 हजार वारकरीही तयार केले आहेत. त्यांच्या हातात ध्वजपताका, टाळ, मृदूंग, वीणा, तुळस, इत्यादी प्रतिकात्मक प्रतिकृती इथं पाहायला मिळते. 22 जुलैपर्यंत हा देखावा बघण्यासाठी ठेवण्यात येणार असल्याचं एल्प्रो मॉलचे चेअरमन आणि मॅनेजिंग डिरेक्टर दिपक कुमार यांनी सांगितलं. दरम्यान, प्रतिमा हुबेहूब असल्यानं या देखाव्यानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
वाह, चक्क मॉलमध्ये साकारली वारी! पुण्यात...आणि कुठं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement