तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख! महाराजांच्या पालखी मुक्कामाची आकुर्डीत जय्यत तयारी
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
पालखीच्या आगमनासाठी इथल्या भाविकांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची खबरदारी पालिकेच्या वतीनं घेण्यात येतेय.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : येत्या 28 जूनपासून आषाढी वारीला सुरुवात होतेय. श्री संत जगतगुरू तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होत आहे. ही पालखी विविध ठिकाणी मुक्कामासाठी थांबते. पालखीचा पाहिला मुक्काम असतो आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात. पालखीच्या आगमनासाठी इथल्या भाविकांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण असून या मंदिरात जय्यत तयारी सुरू आहे. वारकऱ्यांसाठी निवास, जेवण आणि इतर सोयीसुविधांच्या तयारीत सध्या आकुर्डीकर व्यस्त आहेत.
advertisement
मंदिर परिसरात साफसफाई आणि रंगरंगोटी करण्यात येतेय. मंदिराच्या प्रांगणात मंडप उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. पालिकेच्या वतीनं वारकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था शाळा, उद्यान, समाज मंदिर आणि परिसरातील हॉलमध्ये करण्यात येणार आहे.
मंदिर परिसरात विद्युत व्यवस्था आणि वारकऱ्यांसाठी स्नानगृह तसंच फिरत्या शौचालयाची व्यवस्थाही करण्यात येतेय. परिसरातील देशी दारूची दुकानं आणि इतर सर्व दुकानं 2 दिवस बंद ठेवण्यात येतील.
advertisement
वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची खबरदारी पालिकेच्या वतीनं घेण्यात येणार आहे. तसंच सर्व भाविकांना पालखीचं दर्शन घेता यावं यासाठी दर्शनाची रांग आणि जेवणाची व्यवस्था श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ट्रस्टच्या वतीनं करण्यात आली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
June 24, 2024 11:10 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख! महाराजांच्या पालखी मुक्कामाची आकुर्डीत जय्यत तयारी