जे पोटची लेकरं करत नाही, ते 'तो' करतो! निराधारांना आसरा देतो, त्यांचं पोट भरतो

Last Updated:

माणूस म्हणून जगण्यासाठी खरोखर ज्या गोष्टींची आवश्यकता असते ती मदत ते या व्यक्तींना करतात.

+
या

या व्यक्तींची आजारपणंही ते काढतात.

इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : सोलापूर शहरातील रेल्वे स्टेशन, बस स्टँड आणि धार्मिक स्थळं, इत्यादी ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या बेघर, निराधार, मनोरुग्ण आणि भिक्षेकऱ्यांची सहसा कोणाला काळजी नसते. या व्यक्तीसुद्धा समाजाचा एक भाग आहेत, असा विचार करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फार कमी लोक पुढाकार घेतात. अशा लोकांना पाहिलं की, माणुसकी आजही जिवंत आहे याचा प्रत्यय येतो. रमेश चंद मीन हेसुद्धा या देवदूतांपैकी एक.
advertisement
सोलापुरातील डी.आर.एम ऑफिसमध्ये कार्यालयीन अधीक्षक पदावर कार्यरत असलेले रमेश चंद मीन हे निराधार लोकांना आधार देण्यासाठी धडपड करतात. ते मूळचे राजस्थानचे रहिवासी असून सध्या सोलापूरच्या दमानी नगरात राहतात. रेल्वे विभागात ते कार्यरत आहेत. युट्यूबवरील एका व्हिडीओमधून त्यांना निराधार, बेघर, मनोरुग्ण आणि भिक्षेकऱ्यांची सेवा करण्याची प्रेरणा मिळाली. तेव्हापासून ते ज्यांचं कोणीच नाही अशा सर्वांच्या मदतीला धावून जातात.
advertisement
माणूस म्हणून जगण्यासाठी खरोखर ज्या गोष्टींची आवश्यकता असते ती मदत रमेश मीन या व्यक्तींना करतात. ते स्वखर्चातून रस्त्याच्या कडेला आसरा शोधणाऱ्या लोकांना पोटभर जेवण देतात, त्यांना आंघोळ घालणं, त्यांची दाढी करणं, वेळोवेळी आरोग्य तपासणी करणं, त्यांना चांगले नवीन कपडे देणं ही कामं रमेश मीन जबाबदारीनं पार पडतात.
advertisement
या व्यक्तींची आजारपणंही ते काढतात. कोणाला बरं नसल्यास त्यांना सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालयात घेऊन जातात. विशेष म्हणजे या समाजसेवेत त्यांना त्यांची पत्नी हेमा आणि मित्र मंगेश हे सहकार्य करतात. 'भीक नको, दया नको, हवी मायेची सद्भावना' हा विचार जिवंत ठेऊन रमेश मीन सोलापुरातील अनाथ, बेघर, भिक्षेकरी आणि मनोरुग्णांचा आधार बनले आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
जे पोटची लेकरं करत नाही, ते 'तो' करतो! निराधारांना आसरा देतो, त्यांचं पोट भरतो
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement