Ashadhi Wari: पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल, घराबाहेर पडताना पर्यायी मार्ग पाहा!

Last Updated:

तुकाराम महाराजांच्या पालखीचा दुसरा मुक्काम आकुर्डी इथं असेल. तर, माऊलींच्या पालखीचा पहिला मुक्काम आळंदीच्या गांधीवाडा याठिकाणी असेल.

दोन्ही पालख्या 30 जूनला पुण्याच्या दिशेनं मार्गस्थ होतील.
दोन्ही पालख्या 30 जूनला पुण्याच्या दिशेनं मार्गस्थ होतील.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : आषाढी वारीला येत्या काही दिवसांत सुरुवात होईल. संत तुकाराम महाराजांची पालखी 28 जूनला देहूतून मार्गस्थ होत असून 29 जूनला ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने निघणार आहे. दरवर्षी या सोहळ्यात लाखोंच्या संख्येनं वारकरी सहभागी होतात.
तुकाराम महाराजांच्या पालखीचा दुसरा मुक्काम आकुर्डी इथं असेल. तर, माऊलींच्या पालखीचा पहिला मुक्काम आळंदीच्या गांधीवाडा याठिकाणी असेल. त्यानंतर दोन्ही पालख्या 30 जूनला पुण्याच्या दिशेनं मार्गस्थ होतील. यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
advertisement
दिघी वाहतूक विभाग :
  • चिंबळी ते आळंदी रस्ता बंद असून चिंबळी फाटा चौक, चाकण इथून आळंदीकडे येणारी वाहनं जयगणेश एम्पायर चौक, अलंकापुरम चौक मार्ग भोसरी चौक-मॅगझीन चौक मार्गे जातील.
  • चाकण ते आळंदी रस्ता बंद असून जयगणेश एम्पायर चौक, अलंकापुरम चौक मार्ग भोसरी चौक-मॅगझीन चौक इथून वाहतूक सुरू असेल.
  • वडगाव घेणंद ते आळंदी रस्ता बंद असून कोयाळी कमांड, कोयाली-मरकलगाय रोड सुरू असणार आहे.
  • मरकळ ते आळंदी रस्ता बंद असून धानोरेफाटा चहोली फाटा-मॅगझीन चौक / अलंकापुरम चौक मार्गे वाहतूक जाईल.
  • भारत माता चौक ते आळंदी मार्गांवरील वाहनं जयगणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम, भोसरी चौक-मॅगझीन चौक, मोशी-चाकण-शिक्रापूर मार्गे जातील.
  • मोशी आळंदी रस्ता मार्गाची वाहतूक जयगणेश एम्पायर चौक, अलंकापुरम चौक मार्ग, भोसरी चौक-मॅगझीन चौक, मोशी-चाकण-शिक्रापूर मार्गे जाईल.
  • विश्रांतवाडी ते आळंदी रस्ता बंद असून वाहनं भोसरी-मोशी-चाकणमार्गे, चहोली फाटा ते कोयाळी, शेळपिंपळगाव मार्गे जातील, अलंकापुरम जयगणेश एम्पायर चौक मार्गे जाईल.
  • पुणे बाजूकडून आळंदीकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना चहोली फाटा चौकाच्या पुढे, डुडुळगाव जकात नाक्याच्या पुढे, केळगाव चौक, बापदेव चौकाच्या पुढे, इंद्रायणी हॉस्पिटलच्या पुढे, विश्रांतवाडीच्या, धानोरीफाटा/पीसीएस चौकाच्या पुढे जाण्यास प्रवेश बंदी असेल.
  • हा बदल मंगळवारी (ता. 25) दुपारी 12 वाजल्यापासून रविवारी (ता.30) रात्री 9 वाजेपर्यंत किंवा वाहतूक सुरळीत होईपर्यंत लागू असेल.
advertisement
भोसरी वाहतूक विभाग :
  • जुना मुंबई-पुणे हायवे देहू कमान ते देहूगाव रस्ता बंद असून भक्ती-शक्तीचौक ते त्रिवेणीनगर ते तळवडे गावठाण ते कॅनचे चौक ते खंडेलवाल चौक देहूगाव असा राहील.
  • चाकण ते कॅनबे चौक रस्ता बंद असेल, तर सदर मार्गावरील वाहनं मोशी भारतमाता चौक, नाशिक हायवे मार्गावरून जातील.
  • तळेगाव चाकण रोड देहूफाटा ते देहूगाव बंद असून एच.पी. चौक मार्गे जाईल.
  • देहूकमान ते चौदा टाळकरी कमान ते भैरवनाथ चौक हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. खंडेलवाल चौक ते देहू कमान (मुख्य) ते परंडवाल चौक जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असेल.
advertisement
मोशी परिसरातील बदल :
  • मोशीतील हवालदार वस्ती (वाय जंक्शन) ते मोशी चौक दरम्यानच्या रस्त्यावरून गुरुवार (ता. 27) ते रविवार (ता. 30)पर्यंत एकेरी वाहतूक सुरू राहील. मोशी ते हवालदारवस्तीकडं जाणारा रस्ता हा सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असेल. या मार्गावरील वाहनं भारतमाता चौकातून हवालदार वस्तीकडे जातील.
  • मोशी भारतमाता चौक ते हवालदार वस्तीकडे (वाय जंक्शन) जाणाऱ्या जड वाहनांना गुरुवार (ता. 27)पासून रविवार (ता. 30)पर्यंत बंदी असेल.
  • भोसरी पांजरपोळ चौक ते अंलकापुरम चौकाकडे जाणाऱ्या जड वाहनांना रविवारी (ता. 30) पहाटे 4 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत प्रवेश बंद असेल. या मार्गावरील जड वाहनं पांजरपोळ चौकातून पुढे भोसरी पुलावरून जेआरडी टाटा पुलावरून सरळ कोकणे चौक-जगताप डेअरी चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.
advertisement
निगडी वाहतूक विभाग :
  • जुना मुंबई-पुणे हायवे भक्ती शक्ती चौक बंद राहणार असून काचघर चौककडून बिजलीनगर चौक मार्गे डांगे चौकातून पुण्याकडे जाता येईल.
  • खंडोबा माळ चौक ते टिळक चौक व तळवडे ते त्रिवेणीनगर चौक बंद असणार आहे. खंडोबामाळ चौक इथून वाहतूक टिळक चौकाकडे न जाऊ देता ती थरमॅक्स चौक मार्गे किंवा चिंचवड मार्गे जाईल. त्रिवेणीनगर चौक इथं रुपीनगरकडून येणारी वाहतूक भक्ती शक्ती चौकाकडे येऊ न देता ती चिकन चौक मार्गे चाकणकडे जाईल.
  • म्हाळसाकांत चौक ते खंडोबामाळ रस्ता बंद असेल, तर पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पोहचल्यांनतर म्हाळसाकांत चौकाकडून येणारी वाहतूक आकुर्डी गावठाण खंडोबामाळ चौकाकडे येऊ न देता ती टिळक चौक मार्गे जाईल.
  • हा बदल 28 जून रोजी दुपारी 12 वाजल्यापासून 30 जून रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असेल.
advertisement
देहू परिसरातील बदल : 
  • मुंबई-पुणे महामार्गावरील देहू कमान ते देहूगाव या मार्गावरील वाहतूक बंद राहणार असून, या मार्गावरील वाहनं भक्ती शक्ती चौक ते त्रिवेणीनगर ते तळवडे गावठाण ते कॅनबे चौक ते खंडेलवाल चौक देहूगाव या मार्गे जातील.
  • चाकण ते कॅनबे चौक तसंच तळवडे गावठाण चौक ते कॅनबे चौक ते महिंद्रा सर्कल हा मार्ग बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहनं मोशीतील भारतमाता चौक, नाशिक हायवे मार्गे इच्छितस्थळी जातील.
  • खंडेलवाल चौक ते देहू कमान मुख्य ते परंडवाल चौक, खंडेलवाल चौक ते देहू मुख्य कमान ते परंडवाल चौक या मार्गावर जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल.
  • हा बदल 26 जून रोजी दुपारी 12 ते 29 जून रोजी रात्री 9 वाजेपर्यंत असेल.
advertisement
मराठी बातम्या/पुणे/
Ashadhi Wari: पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल, घराबाहेर पडताना पर्यायी मार्ग पाहा!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement