advertisement

पुणे-सोलापूर महामार्गावर लोकांना अडवून धक्कादायक कांड, मग 1200 KM प्रवास, अखेर बेड्या

Last Updated:

पोलीस असल्याची बतावणी करून प्रवाशांची लूट करणाऱ्या आंतरराज्यीय सराईत गुन्हेगाराला फौजदार चावडी पोलिसांनी अटक केली आहे.

News18
News18
सोलापूर : पुणे-सोलापूर महामार्गावर पोलीस असल्याची बतावणी करून प्रवाशांची लूट करणाऱ्या आंतरराज्यीय सराईत गुन्हेगाराला फौजदार चावडी पोलिसांनी अटक केली आहे. जाफर शहाजमान इराणी राहणार लोणी काळभोर, पुणे असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून 35 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे शहरात घडलेले चार चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
23 डिसेंबर 2025 रोजी सोलापूर-पुणे हायवेवरील नागोबा मंदिराजवळ जाफरने आणि त्याच्या साथीदाराने दुपारच्या सुमारास एका व्यक्तीला अडवून आम्ही पोलीस असा भासवला. हातचलाखीने त्यांच्याकडील 35 ग्रॅमचे सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
जाफर हा पुण्यातून तडीपार आहे. परळी वैजनाथ येथे लपल्याची माहिती मिळाल्यावर पोलिस पोहोचण्यापूर्वीच तो पळाला. त्यानंतर लोणी काळभोर, जेजुरी, सातारा, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी वास्तव्य बदलले. फौजदार चावडी पोलिसांचे डी.बी. पथकाने वेषांतर करून सलग तीन दिवस आणि रात्री त्याचा पाठलाग केला.
advertisement
अखेर 1200 किलोमीटरचा प्रवास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथून पहाटेच्या सुमारास त्याला ताब्यात घेण्यात आले.पोलिसांनी सांगितले, जाफरवर यापूर्वी फसवणूक, घरफोडी, चेन स्नॅचिंगसारखे 18 गुन्हे दाखल आहेत. त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. ही अटक महामार्गावरील गुन्ह्यांना लगाम घालण्यात महत्त्वाची ठरली आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
पुणे-सोलापूर महामार्गावर लोकांना अडवून धक्कादायक कांड, मग 1200 KM प्रवास, अखेर बेड्या
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement