अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त मध्यरात्रीपासून घेता येईल सिद्धिविनायकाचं दर्शन, पूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर!

Last Updated:

मुंबईतील श्री सिद्धिविनायकाच्या चरणी देश-विदेशातील भाविक नतमस्तक होतात. या मंदिरात अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त जय्यत तयारी सुरू आहे.

25 जून रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी आहे.
25 जून रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी आहे.
प्रियंका जगताप, प्रतिनिधी
मुंबई : कोणत्याही शुभकार्याच्या सुरुवातीला आपण बाप्पाला साकडं घालतो. सर्व देवतांच्या आधी त्याला पूजतो. गणरायाच्या व्रतांपैकी संकष्ट चतुर्थीचं व्रत अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. 25 जून रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. यानिमित्तानं विविध गणेश मंदिरांमध्ये भाविक दर्शनासाठी रांगा लावतील. मुंबईतील श्री सिद्धिविनायकाच्या चरणी देश-विदेशातील भाविक नतमस्तक होतात. या मंदिरातही अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त जय्यत तयारी सुरू आहे.
advertisement
25 जून उजाडल्यानंतर मध्यरात्री 1.30 वाजल्यापासून सिद्धिविनायक मंदिरात दर्शनाला सुरुवात होणार आहे. भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन मंदिर न्यास प्रशासनानं विशेष नियोजन केलं आहे. दर्शनासाठी सर्वसामान्य रांग, स्त्रियांची रांग, मूखदर्शन आणि आशिर्वाचन पूजेची रांग अशी व्यवस्था आहे. तसंच मंडप, विनामूल्य पादत्राणे ठेवणं, वैद्यकीय सुविधा, भाविकांसाठी विनामूल्य पाणी आणि चहाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
advertisement
दर्शनाची व्यवस्था पुढीलप्रमाणे :
  • 25 जून रोजी मध्यरात्री 1.30 वाजल्यापासून पहाटे 3.15 वाजेपर्यंत.
  • पहाटे 3.50 वाजल्यापासून दुपारी 12.00 वाजेपर्यंत.
  • दुपारी 12.30 वाजल्यापासून संध्याकाळी 7.00 वाजेपर्यंत.
  • संध्याकाळी 7.00 वाजल्यापासून रात्री 9.00 वाजेपर्यंत दर्शन घेता येईल.
आरती पुढीलप्रमाणे :
  • काकड आरती आणि महापूजा : 25 जून रोजी रात्री 12.10 वाजल्यापासून 1.30 वाजेपर्यंत.
  • आरती : पहाटे 3.15 वाजल्यापासून 3.50 वाजेपर्यंत.
  • नैवेद्य : दुपारी 12.00 वाजल्यापासून दुपारी 12.30 वाजेपर्यंत.
  • धुपारती : संध्याकाळी 7.00 वाजल्यापासून संध्याकाळी 7.10 वाजेपर्यंत.
  • महापूजा, नैवेद्य आणि आरती : रात्री 9.00 वाजल्यापासून रात्री 10.45 वाजेपर्यंत.
  • चंद्रोदयाची वेळ : रात्री 10.28 वाजता.
advertisement
दरम्यान, श्री सिद्धिविनायक मंदिराची आशिर्वाचनाची रांग सिद्दी प्रवेशद्वार क्रमांक - 3 इथून असेल. गाभाऱ्यातील दर्शनासाठी रचना संसद कॉलेज मंदिर प्रवेशद्वार क्रमांक - 4 इथून रांग सुरू होईल. मूखदर्शनाची रांग ही एस के बोले आगरमार्ग बाजार मंदिर प्रवेशद्वार क्रमांक - 7 इथून सुरू होईल.
मराठी बातम्या/अध्यात्म/
अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त मध्यरात्रीपासून घेता येईल सिद्धिविनायकाचं दर्शन, पूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement