'हे' 3 शब्द बाप्पाला अतिप्रिय! उच्चारल्यास उजळू शकतं भाग्य, पण...
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
कोणतंही शुभकार्य सुरू करण्यापूर्वी गणरायाची पूजा केली जाते. कोणत्याही पूजेच्या वेळी आपण सर्वात आधी बाप्पालाच साकडं घालतो. त्यामुळे पुढचं कार्य सुरळीत पार पडतं आणि म्हणूनच बाप्पाला विघ्नहर्ता म्हटलं जातं. असं म्हणतात की, ज्याच्यावर गजाननाची कृपा त्याचा शून्यातूनही उद्धार होऊ शकतो आणि जर बाप्पा क्रोधीत झाले तर मात्र राजाचाही रंक होऊ शकतो. (परमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
advertisement
advertisement
या शब्दोच्चारांमुळे आपल्या घरात कायम सुख-समृद्धीचा वास राहतो. शिव पुराणांमध्ये उल्लेख आहे की, गणपती बाप्पाच्या पूजेवेळी त्यांचा वास आपल्या घरात निश्चितच असतो. म्हणूनच बाप्पाची पूजा कायम विधीवत करावी. शिवाय त्या 3 शब्दांचं पूजेनंतर उच्चारण केल्यास बाप्पा प्रचंड प्रसन्न होतात आणि मग आपलं भाग्य उजळायला वेळ लागत नाही.
advertisement
ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, बाप्पाची विधीवत पूजा केल्यानंतर गायीच्या शेणाची गोवरी जाळावी. त्यावर धूप ठेवून 'धुम्रवर्ण विनायक विराजो' या शब्दांचं उच्चारण करावं. यामुळे बाप्पा प्रसन्न होऊन आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. परंतु लक्षात घ्या, या 3 शब्दांचं उच्चारण गणेश पूजनानंतरच करावं, असं ज्योतिषांनी सांगितलं.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)