याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिवा-सावंतवाडी रेल्वेगाडीला पेण स्टेशनवर पुन्हा थांबा देण्यात आला आहे. या रेल्वेला पूर्ववत थांबा दिला जावा, अशी मागणी पेणमधीलन नागरिक करत होते. खासदार धैर्यशील पाटील यांनीही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासमवेत बैठक घेऊन हीच मागणी केली होती. या मागणीला यश आलं असून रेल्वे मंत्रालयाने दिवा-सावंतवाडी ट्रेनसाठी पेण थांबा जाहीर केला आहे.
advertisement
Ratnagiri: गणेश विसर्जनाला वाहतूक मार्गात मोठे बदल, रत्नागिरीतील हे मार्ग बंद, पाहा पर्यायी रस्ते
रायगड जिल्ह्यातील पेण शहरात मोठं रेल्वे स्टेशन आहे. मात्र, याठिकाणी काही रेल्वे थांबत नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते. पेणच्या उत्तरेकडे कासू हे रेल्वे स्टेशन आहे तर दक्षिणेकडे हमरापूर हे स्टेशन आहे. याठिकाणी देखील काही रेल्वे गाड्या थांबत नाहीत. म्हणून दिवा-सावंतवाडी गाडीला पेण येथे थांबा देण्याची मागणी केली जात होती. या रेल्वेला यापूर्वी पेण येथे थांबा होता. मात्र, कोरोना काळात पेण येथील थांबा बंद करण्यात आला होता.
पेण रेल्वे स्टेशन हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या पनवेल-रोहा मार्गावर आहे. या स्टेशनवरून पेण-दिवा मेमू ट्रेन सुटते. त्यामुळे पेण ते मुंबई आणि इतर भागांमध्ये प्रवास करणं सोपं होतं. पण, प्रवाशांची संख्या बघता ही गाडी पुरेशी ठरत नाही. म्हणून पेणमधील नागरिक दिवा-सावंतवाडी गाडीच्या थांब्याची मागणी करत होते.