TRENDING:

राज आणि उद्धव ठाकरेंची बंद दाराआड 40 मिनिटे चर्चा, भेटीदरम्यान एकही नेता नाही; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?

Last Updated:

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी पोहोचले आहेत. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात भेट झाली. संजय राऊत यांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्यानंतर ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित उपस्थित होते.
Raj & Uddhav Thackeray
Raj & Uddhav Thackeray
advertisement

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भेटीबाबत गुप्तता पाळण्यात आली. नियोजित भेट नसताना राज ठाकरे थेट उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी दाखल झाले. याअगोदर देखील दोन्ही भावांनी भेटीसंदर्भात गुप्तता पाळली होती. आज संजय राऊत यांच्या कौटुंबिक कार्यक्रमाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. त्यानंतर अचानक राज ठाकरे मातोश्री निवासस्थानी दाखल झाले. महत्त्वाचे म्हणजे राज- उद्धव भेटीदरम्यान कोणतेही इतर नेते मातोश्रीवर उपस्थित नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

advertisement

40 मिनिटे राज ठाकरे मातोश्रीवर

संजय राऊत यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात ठाकरेंच्या सेनेचे अनेक नेते उपस्थित होते. त्यापैकी कोणत्याही नेत्याला राज ठाकरे मातोश्रीवर जाणार आहेत याची कोणाला कल्पना नव्हती. संजय राऊत यांच्या कौटुंबिक कार्यक्रमाला खासदार अनिल देसाई, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार सचिन अहिर उपस्थित होते. जवळपास 40 मिनिटं राज ठाकरे मातोश्रीवर होते. दुपारी ०२:३० वाजता आत गेले आणि ०३:१० ला बाहेर पडले.

advertisement

राज ठाकरे दुसऱ्यांदा मातोश्रीवर दाखल

याअगोदर देखील राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला थेट मातोश्रीवर दाखल झाले होते. तसेच गणेशोत्सवानंतर देखील उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गुप्तता पाळून ठराविक नेत्यांसोबत शिवतीर्थावर पोहचले होते.यावेळी राज ठाकरेंसोबत पत्नी शर्मिला ठाकरे देखील होत्या. शर्मिला ठाकरे या अनेक वर्षांनी मातोश्रीवर दाखल झाल्या.

advertisement

ठाकरे बंधूंच्या भेटीगाठींचा सिलसिला

  • 5 जुलै 2025
  • मराठी विजयी मेळावा

  • 27 जुलै 2025
  • मातोश्री (उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त)

  • 27 ऑगस्ट 2025
  • शिवतीर्थ निवासस्थान (गणेशोत्सव)

  • 10 सप्टेंबर 2025

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
यंदा 6 की 7 ऑक्टोबर कधी आहे कोजागिरी पौर्णिमा? पूजा विधी आणि संपूर्ण माहिती
सर्व पहा

शिवतीर्थ निवासस्थान (उद्धव ठाकरे संजय राऊत, अनिल परबांसह राज ठाकरेंच्या भेटीला)

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राज आणि उद्धव ठाकरेंची बंद दाराआड 40 मिनिटे चर्चा, भेटीदरम्यान एकही नेता नाही; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल