मनसेचा आज 19 स्थापना दिन पक्षाच्यावतीने साजरा करण्यात येत आहे. पक्ष स्थापनेच्या तब्बल 19 वर्षानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड मध्ये पक्षाच्या मेळाव्यासाठी दाखल झाले. यावेळी ज्येष्ठ अभ्यास डॉ. सदानंद मोरे यांनी महाराष्ट्राच्या इतिहासाच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना संबोधित केले. राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना संबोधित करताना विविध मुद्यांवर भाष्य केले.
राज ठाकरे यांनी काय म्हटले?
advertisement
सध्या राजकीय पक्ष हे राजकीय फेरीवाले झाले असल्याचे सांगत त्यांनी पक्ष फुटीवर सडकून टीका केली. राज यांनी म्हटले की, सगळे राजकीय फेरीवाले आले तसे आपण नाहीत. इकडंन डोळा मारला की इकडे तिकडं न डोळा मारला की तिकडे जातात. आपण असे फेरीवाले नाहीत आपण अख्खा दुकान उभे करू पण हे राजकीय फेरीवाले होणार नसल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटले.
गंगेचे पाणी कोण पिणार? राज ठाकरेंचे वक्तव्य..
राज ठाकरे यांनी म्हटले की, काही पदाधिकारी कुंभमेळ्याला गेले होते. बाळा नांदगावकर यांनी छोट्याशा कमंडलूमध्ये तिथलं पाणी आणलं होतं. त्यावर हड्ड मी नाही पिणार म्हटलं. सोशल मीडियावर पाहतोय लोक तिकडं आघोळ करतात.
त्या गंगेचे पाणी कोण पिणार, श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही. एकही नदी देशात स्वच्छ नाही. राज कपूरांनी एक चित्रपट काढला. लोकांनी म्हटले ही अशी गंगा असेल तर आम्ही पण आंघोळ करतो. पण नदी काही स्वच्छ झाली नाही. राजीव गांधी पंतप्रधान असल्यापासून नदी स्वच्छ होणार असल्याचे सांगत आहेत. एकही नदी स्वच्छ नाही. तरीही आम्ही नदीला माता म्हणतो. परदेशात नदी स्वच्छ आहे तेथील लोक नदीला माता मानत नाही असे राज ठाकरे यांनी सांगितले. अंधश्रद्धेतून थोडं बाहेर पडा, थोडं डोकं हलवा असेही राज ठाकरे यांनी म्हटले.